'विठ्ठल' मध्ये अवतरला श्रेयस तळपदे ?

महाराष्ट्रचं आराध्यदैवत आणि अखंड वारकरी समुदायाच्या लाडक्या विठूमाऊलीवर आधारित ' विठ्ठल ' या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या सिनेमाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे.

SHARE

मराठीमध्ये बिग बजेट 'बाजी' हा चित्रपट बनवल्यानंतर अभिनेता श्रेयस तळपदे हिंदीत खूपच बिझी झाला. बड्या बॅनरच्या चित्रपटांमध्ये  धमाल करणारा हा मराठमोळा अभिनेता पुन्हा मराठी चित्रपटामध्ये दिसणार आहे. 'विठ्ठल' या आगामी मराठी चित्रपटात श्रेयसचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे.


टीजर प्रदर्शित

महाराष्ट्रचं आराध्यदैवत आणि अखंड वारकरी समुदायाच्या लाडक्या विठूमाऊलीवर आधारित ' विठ्ठल ' या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. कंबरेवर हात ठेऊन विटेवर उभा असणाऱ्या विठू माउलीचं मनुष्य रूप दाखवणाऱ्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेटवर्किंग साईट वर टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरचं मुख्य आकर्षण आहे श्रेयस तळपदे.


अद्याप गुपितच 

राजीव रुईया यांची कथा आणि दिग्दर्शन तसेच टेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाच्या टीजर मध्ये सुरुवातीला भव्यदिव्य विठ्ठलाची मूर्ती दिसते. त्यावर अभिराचा वर्षाव होत ढोल ताशाच्या  गजरात  माउलीला वंदन करताना श्रेयस दिसतो. त्यामुळे या चित्रपटात श्रेयस तळपदे नेमक्या कोणत्या भूमिकेमधून दिसून येणार? हा प्रश्न पडणं साहाजिक आहे. श्रेयस या चित्रपटात काय करतो आहे, हे अद्याप गुपितच ठेवण्यात आलं आहे. 


७ डिसेंबरला प्रदर्शित

आजच्या आधुनिक युगात देव आणि भक्त यांच्यामधील नातं सांगणारा हा सिनेमा ७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. 'विठ्ठल' नामाचा गजर करणाऱ्या या सिनेमाची दशरथ सिंह राठोड आणि उमेद सिंह राज पुरोहित यांनी निर्मिती केली आहे. 'विठ्ठल' या सिनेमाची पटकथा रवींद्र पाटील यांची असून, संदीप दंडवते यांनी संवादलेखन केले आहे.  विठ्ठलाच्या भूमिकेत सचित पाटील दिसणार असून त्यांच्या जोडीला हर्षदा विजय ही नवोदित अभिनेत्रीदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहे , तसेच अशोक समर्थ, भाग्यश्री मोटे, दीप्ती धोत्रे आणि हितेन तेजवानी या कलाकारांचादेखील यात समावेश आहे.

टीजर लिंक - https://youtu.be/uKZQIlxcQu8हेही वाचा - 

समीर धर्माधिकारी साकारणार डॉन

संयमी करणार ‘माऊली’चा जयघोष!
संबंधित विषय
ताज्या बातम्या