अमृता मागणार का तिची माफी?

छोट्या पडद्यावरील काही मालिकांमधील ट्वीस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. ‘घाडगे & सून’ ही मालिकाही अशाच एका वळणावर पोहोचल्यानं अमृता चित्राची माफी मागणार का? असा प्रश्न रसिकांना पडला आहे.

SHARE

छोट्या पडद्यावरील काही मालिकांमधील ट्वीस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. ‘घाडगे & सून’ ही मालिकाही अशाच एका वळणावर पोहोचल्यानं अमृता चित्राची माफी मागणार का? असा प्रश्न रसिकांना पडला आहे.

अनेक विघ्न, अडचणीनंतर अखेर अमृता आणि अक्षयचा लग्न सोहळा पार पडला आणि अमृता घाडगे सदन मध्ये सून म्हणून आली आणि अक्षय–अमृतचा नवा प्रवास सुरू झाला आहे. अमृता आणि अक्षयचा सुखाचा संसार सुरू झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. पण अमृतासोबतच घाडगे सदनमध्ये चित्रा देखील सून म्हणून आली. चित्राचा घाडगे सदनमध्ये येण्यामागचा हेतू माई आणि अमृता वा घरातील कुठल्याच सदस्याला अजून माहिती नाही आहे. चित्रा अनंतची बायको म्हणून घरामध्ये यावी हा अमृताचा निर्णय वसुधाला मात्र पटलेला नसून यामुळं वसुधा अमृतावर नाराज आहे. आपली नाराजगही तिनं परिवारासमोर व्यक्त देखील केली आहे.

आता चित्राच्या घरामध्ये येण्यानं कुठलं नवं संकट परिवरावर येणार? हे हळूहळू कळेलच. चित्राचा डोळा घाडगेंच्या संपत्तीवर आहे आणि ते मिळविण्यासाठी ती आता काय काय कारस्थानं रचेल आणि माई-अमृता याला कशा सामोऱ्या जातील त्यावर कशी मात करतील? हे बघणं रंजक अर्‍यासणार आहे. घरामध्ये आनंदाचं वातावरण असतानाच त्यामध्ये चित्रा मिठाचा खडा टाकणार आहे. अक्षय आणि अनंतच्या लग्नानंतर माई घरामध्ये पूजा ठेवणार आहेत. या पूजेदरम्यान असं काय घडलं, वा चित्रानं असं काय केलं ज्यामुळं माईंनी अमृताला चित्राची माफी मागायला सांगितली? नात्यामध्ये फुट पाडण्याच्या हेतूमध्ये चित्रा यशस्वी होईल? की अमृताला चित्राचा हेतू कळेल हे ‘घाडगे & सून’च्या महा रविवार विशेष भागात पहायला मिळणार आहे.हेही वाचा -

पश्चिम बंगालमध्ये चित्रीत होतोय मराठी सिनेमा

शिवा–सिध्दीच्या आयुष्यात हे घडणार!
संबंधित विषय
ताज्या बातम्या