Advertisement

देवेंद्र फडणवीस कमालीचा माणूस - नाना पाटेकर


देवेंद्र फडणवीस कमालीचा माणूस - नाना पाटेकर
SHARES

देवेंद्र फडणवीस कमालीचा चांगला माणूस आहे, असा मुख्यमंत्री आपल्याला हवा आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. पण मी भाजपाचा प्रवक्ता नाही हे देखील सांगायला नाना विसरले नाहीत.


कोणत्याही पक्षाशी संबध नाही

मुंबईतील 'व्हिजेेटीआय इन्स्टिट्यूट'च्या कार्यक्रमात अभिनेते नाना पाटेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नाना पाटेकर यांनी त्यांच्या शैलीत उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. माझा कोणत्याही पक्षाशी संबध नाही, अथवा मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी शिवसेनेचा नाही, भाजपचाही नाही.


'असा मुख्यमंत्री आपल्याला हवा'

मी परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत पाहत होतो, तेव्हा त्यांनी अगदी शांतपणे आपण राज्यात काय काय केले? कुठे चुकलो? हे अगदी साध्या, सरळ पद्धतीने सांगितलं. यामध्ये त्यांनी काहीही लपवले नाही. असा मुख्यमंत्री आपल्याला हवा आहे, असं मला वाटतं, असं नाना म्हणाले.

जनतेच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे, असा विचार राजकारणात येण्यामागे असावा, मात्र आताचं राजकारणी हा विचार कुठे करतात? असा सवाल नानांनी उपस्थित केला. गेल्या ५० वर्षांत मी माझ्या चेहऱ्यामुळे नाही, तर माझ्या विचारांमुळे टिकलो, असंसी त्यांनी स्पष्ट केलं. 


हेही वाचा - 

'लायकी नसलेल्यांना महत्त्व देऊ नका'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा