Advertisement

हृतिकने घेतली रणवीरची जागा! काय करणार आहे ह्रतिक?


हृतिकने घेतली रणवीरची जागा! काय करणार आहे ह्रतिक?
SHARES

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल येत्या ७ तारखेपासून सुरू होत आहे. लीगमधील सामन्यांकडे जसे सर्वांचे लक्ष असते, त्याचप्रमाणे सर्वांचे लक्ष त्याच्या उद्घाटन सोहळ्याकडे देखील असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आयपीएल २०१८चा उद्घाटन सोहळा धमाकेदार असणार आहे. या सोहळ्यात आधी रणवीर सिंग परफॉर्मन्स करणार होता. मात्र आता रणवीरची जागा हृतिक रोशनने घेतली आहे.
 


यावर्षी खांद्याच्या दुखापतीमुळे रणवीर सिंग आयपीएलमध्ये परफॉर्म करणार नाहीये. रणवीरच्या ऐवजी हृतिक थिरकताना दिसणार आहे. रणवीरच्या चाहत्यांची जरी निराशा झाली असली, तरी हृतिकचे चाहते मात्र भलतेच खूष झाले आहेत. या सोहळ्यासाठी आंतरराष्ट्रीय कोरिओग्राफर शामक दावर यांनी कोरिओग्राफी केली आहे. बॉलिवूड नृत्यदिग्दर्शक शामक दावर हे नृत्यातील अनोख्या प्रयोगांसाठी ओळखले जातात.


शामक आणि हृतिक या दोघांनी याआधी 'धूम २' या चित्रपटामध्ये एकत्र काम केलेलं आहे. तसेच अनेक अवॉर्ड्स शो मध्येही दोघांनी एकत्र काम केल आहे. नृत्यदिग्दर्शक शामक दावरने पुन्हा एकदा हृतिकसोबत काम करत असल्याची बातमी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नुकतीच दिली होती.

 


हेही वाचा

'छोटी मालकीण'मध्ये होणार दादूसचा धमाकेदार परफॉर्मन्स!


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा