Update : श्रीदेवी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

श्रीदेवी यांचं अखेरचं दर्शन व्हावं, यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर चाहत्यांची गर्दी झाली आहे. सेलिब्रेशन क्लब येथून दुपारी 2 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. तर पवनहंसजवळील विलेपार्ले स्मशानभूमीत श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.

 • Update : श्रीदेवी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

SHARE

बॉलिवूडमध्ये 'हवाहवाई' या नावाने ओळखळी जाणारी अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर बुधवारी संध्याकाळी 4.30 वाजेच्या दरम्यान अंत्यसंस्कार होतील.

54 वर्षांच्या श्रीदेवी यांच्या आकस्मित मृत्यूची सखोल चौकशी पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी त्यांचं पार्थिव कपूर कुटुंबियांना सोपवलं. रात्री 10 वाजेच्या दरम्यान खासगी विमानाने त्यांचं पार्थिव मुंबईत आणण्यात आलं. यावेळी बोनी कपूर यांच्यासह अनिल कपूर, सोनम कपूर, टीना आणि अनिल अंबानी विमानतळावर उपस्थित होते. त्यानंतर त्यांचं पार्थिव श्रीदेवी यांच्या लोखंडवाला येथील घरी आणण्यात आलं. 

श्रीदेवी यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी बॉलिवूड कलाकारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. 

संध्याकाळी - 5.25 - श्रीदेवी अनंतात विलीन

संध्याकाळी - 5.15 -  विलेपार्ले येथील स्मशानभूमीत श्रीदेवी यांच्यावर अंत्यसंस्कार

संध्याकाळी - 5.00 - श्रीदेवी यांच्या पार्थिवावर विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यविधी सुरू

संध्याकाळी 4.10 - श्रीदेवी यांचं पार्थिव विलेपार्ले स्मशानभूमीत दाखल

संध्याकाळी 4.00 - अभिनेता शाहरुख खान श्रद्धांजली वाहण्यासाठी दाखल 

दुपारी  2.15 - श्रीदेवींचं पार्थिव स्मशानभूमीकडे रवाना 

दुपारी 2.00 - श्रीदेवी यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलं

दुपारी 12.30 - गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी पोलिसांची तयारी सुरू

दुपारी 12.25 - श्वेत फुलांनी सजवलेल्या या गाडीतूनच श्रीदेवींची अंत्ययात्रा निघणार 

दुपारी 12.23 - शाहिद कपूर आणि मिरा कपूर श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दाखल झाले 

दुपारी 12.17 - राकेश रोशन श्रद्धांजली वाहण्यासाठी दाखल

दुपारी 12.15 - अभिनेत्री विद्या बालन श्रद्धांजली देण्यासाठी दाखल 

दुपारी 12.11 - अभिनेता चिरंजीवी श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दाखल

दुपारी 12.10 - अभिनेता अजय देवगण श्रद्धांजली देण्यासाठी दाखल

कलाकारांसोबत चाहतेही गेले दोन दिवस त्यांच्या घराबाहेर गर्दी करून आहेत.

बुधवारी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत श्रीदेवी यांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. वर्सोव्यातील भाग्य बंगला आणि सेलिब्रेशन क्लबमध्ये त्यांच्या चाहत्यांना अंत्यदर्शन घेता येईल.

श्रीदेवी यांचं अखेरचं दर्शन व्हावं, यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर चाहत्यांची गर्दी झाली आहे. सेलिब्रेशन क्लब येथून दुपारी 2 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. तर पवनहंसजवळील विलेपार्ले स्मशानभूमीत श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.

कार्डिअॅक अरेस्ट नव्हे, बुडाल्यानेच मृत्यू

शनिवारी मध्यरात्री श्रीदेवी यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं वृत्त पसरलं होतं. त्यांच्या हॉटेल रूमच्या बाथटबमध्ये त्या पडलेल्या आढळून आल्या. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. त्यांच्या पार्थिवाचं शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचं निधन ह्रदयविकाराने नसून बाथटबमध्ये बुडाल्यामुळे झाल्याचं समोर आलं. तसेच, त्यांच्या डोक्याला जखमही झाल्याचं समोर आलं. त्यामुळे बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यामुळे बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचं निदान फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये करण्यात आलं.

हेही वाचा - 

अखेर श्रीदेवी यांचं पार्थिव मुंबईत आणण्यास परवानगी

आता श्रीदेवी यांच्या कॉल रेकॉर्ड्सची तपासणी

श्रीदेवी यांच्या मृत्यूबाबत दुबईहून नवा खुलासा

श्रीदेवी यांचा 'शिद्दत' चुकला, 'झिरो' ठरला शेवटचा चित्रपट

दुबईतल्या लग्न सोहळ्यातले श्रीदेवी यांचे अखेरचे क्षण...

संबंधित विषय
ताज्या बातम्या