Advertisement

शशांक केतकर पुन्हा चढला बोहल्यावर!

'होणार सून मी या घरची'मधून लोकप्रियतेच्या शिखरावर चढलेला अभिनेता शशांक केतकर दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे! त्याची मैत्रिण प्रियांका ढवळे हिच्यासोबत त्यानं लग्न केलं आहे. शशांक केतकरचं हे दुसरं लग्न आहे. सोमवारी पुण्यामध्ये हा लग्नसोहळा पार पडला.

शशांक केतकर पुन्हा चढला बोहल्यावर!
SHARES

'होणार सून मी या घरची'मधून लोकप्रियतेच्या शिखरावर चढलेला अभिनेता शशांक केतकर दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे! त्याची मैत्रिण प्रियांका ढवळे हिच्यासोबत त्यानं लग्न केलं आहे. शशांक केतकरचं हे दुसरं लग्न आहे. सोमवारी पुण्यामध्ये हा लग्नसोहळा पार पडला.
मालिकांसोबतच नाटकांमध्येही केलं काम

प्रियांका ढवळे ही व्यवसायाने वकील आहे. 'होणार सून मी या घरची 'या मालिकेतून शशांक घरा-घरांत पोहोचला. त्याच्या सरळ साध्या अभिनयामुळे अल्पावधीतच तो लोकप्रिय झाला. याचबरोबर शशांकने 'स्वप्नांच्या पलिकडले’, 'इथेच टाका तंबू' या मालिकांसोबतच 'गोष्ट तशी गंमतीची' या नाटकामध्ये भूमिका साकारली आहे. त्याच्या 'वन वे तिकीट' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवला नसला, तरी शशांक या चित्रपटात भाव खाऊन गेला.
एप्रिलमध्ये झाला साखरपुडा

याआधी 'होणार सून मी या घरची' या मालिकेदरम्यान शशांकची तेजश्री प्रधान हिच्याशी ओळख झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र वर्षभरातच ते विभक्त झाले. एप्रिलमध्ये शशांकचा प्रियांका ढवळे हिच्यासोबत साखरपुडा झाला होता आणि सोमवारी ते लग्नबंधनात अडकले.हेही वाचा

नम्रता गायकवाडच्या या लूकमागे दडलंय काय?

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा