SHARE

राधा प्रेम रंगी रंगली ही मालिका आता रंजक वळणावर आहे. येत्या होळी आणि रंगपंचमीच्या आठवड्यामध्ये दीपिका एक नवी खेळी खेळणार आहे. ज्यामध्ये प्रेम आणि राधा अडकणार का? प्रेमला दीपिकाचे सत्य कळेल का? या प्रश्नांचा उलगडा पुढील भागांत होणार आहे.


होळीचा स्पेशल भाग

या वर्षीची होळी निंबाळकरांच्या परिवारामध्ये जोशात साजरी होणार आहे. कारण राधा-प्रेम तसेच अन्विता-आदित्य यांची लग्नानंतरची ही पहिलीच होळी आहे. या होळी सेलिब्रेशनसाठी सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमामधील प्रेक्षकांचे लाडके प्रसेनजीत कोसंबी आणि विश्वजित बोरवणकर निंबाळकरांच्या घरी रंगपंचमी साजरी करायला जाणार आहेत.

ज्यामध्ये हे दोघे त्यांची ये ग ये ये मैना, देखा ना हाय रे आणि प्रीतीचा विंचू ही दमदार गाणीदेखील सादर करणार आहेत. तेव्हा 'राधा प्रेम रंगी रंगली'चा हा होळी आणि रंगपंचमी विशेष भाग रंजक असणार आहे यात शंका नाही!

या सगळ्या आनंदमयी वातावरणामध्ये दीपिका आपले कारस्थान रचणार आहे. ज्यामध्ये ती प्रेम आणि राधाला ती गरोदर असल्याचं सांगणार आहे. आता प्रेमला दीपिकाचं हे कारस्थान कळल्यावर तो काय करेल? हे बघणे रंजक ठरणार आहे.


'घाडगे & सून'मध्ये काय?

तर दुसरीकडे घाडगे & सून या मालिकेत अमृता आणि अक्षय नुकतेच जेजुरीहून परतले आहेत. आणि आता घाडगे परिवाराला वेध लागलेत होळी आणि रंगपंचमी या सणाचे. घाडगे सदनमध्ये प्रत्येक सण जोरात आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो. अक्षय आणि अमृताची ही पहिलीच रंगपंचमी म्हणजे ती इतर सणांप्रमाणे जोरात साजरी होणार यात शंकाच नाही. या होळी आणि रंगपंचमीच्या शुभ मुहूर्तावर अक्षय आणि अमृताच्या आयुष्यातील सगळी संकटं दूर होऊन या दोघांवर प्रेमाचा रंग चढेल का? हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.हेही वाचा

प्रिया वरियार करते नजरेने घायाळ! आधी व्हिडिओ, आता फोटो व्हायरल!


संबंधित विषय
ताज्या बातम्या