Advertisement

'पद्मावती', 'न्यूड' आणि राजकारण!


'पद्मावती', 'न्यूड' आणि राजकारण!
SHARES

काही सिनेमांच्या पाठी लागणाऱ्या कटकटी कधीच संपत नाहीत. गेल्या काही आठवड्यांपासून 'पद्मावती' सिनेमाचे वाद दिवसेंदिवस आहेत. आता यामध्ये राजकीय पक्षही सामील होऊ लागले आहेत. पद्मावती विरोधात आता भाजप आमदार आणि मनसे ही पुढे आले आहेत. राम कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन 'पद्मावती'बाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

‘विशिष्ट समाजाला दुखावणारे दृश्य चित्रपटातून न काढल्यास यापुढे भन्सालींच्या कोणत्याही सिनेमाचं शुटींग होऊ देणार नाही’, असा त्यांनी इशारा दिला आहे. फिल्म स्टुडियो अलाइड मजदूर युनियनच्या माध्यमातून याबाबतची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.



‘केवळ स्वत:च्या प्रसिद्धीसाठी अशा पद्धतीनं इतिहासाशी खोडसाळपणा करणं आणि लोकांच्या भावना दुखावणं हे कोणत्याही निर्माता किंवा दिग्दर्शकाला करता येणार नाही’, असंही राम कदम यावेळी म्हणाले.

तर 'पद्मावती' प्रकरणात आता मनसेनेही उडी मारली आहे. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी "चित्रपट पाहिल्याशिवाय राजपूत समाजाने त्याला विरोध करू नये. भाजपचे काही आमदार या सिनेमाला विरोध करत आहेत. त्यांचं सरकार आहे. मनसे ही प्रदर्शनाआधी हा सिनेमा पाहणार आणि त्यात जर काही आक्षेपार्ह आढळल्यास त्याला विरोध केला जाईल," असे म्हटले आहे.



अमेय खोपकर यांनी 'न्यूड 'आणि 'एस दुर्गा' या सिनेमांना गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळालेल्या वागणुकीचाही निषेध केलाय. गोवा फिल्म फेस्टिव्हल येत्या २० नोव्हेंबरला सुरु होणार आहे. यावेळी केंद्रीय प्रसारण विभागाचा निषेध करण्यासाठी अनेक मराठी कलावंत 'न्यूड' सिनेमाच्या बाबतीत झालेल्या अन्यायाविरोधात एकत्र येऊन निषेध करणार आहे.



हेही वाचा

आहे वाद तरीही...'न्यूड' सिनेमाचा टीजर लॉन्च!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा