Advertisement

‘मनातल्या मनात’ एकत्र आले सोनाली-सिद्धार्थ

'मनातल्या मनात' ही पाच एपिसोडची वेब सिरीज आहे. लग्नासाठी सज्ज असलेल्या अभिषेक आणि शिवानी यांच्या लग्नापूर्वीच्या पाच भेटी या मालिकेत चित्रित केल्या गेल्या आहेत. अभिषेक आणि शिवानी यांची व्यक्तिमत्वं आणि विचारसरणी भिन्न आहे. मजेशीर बाब म्हणजे त्यांची हृदयं त्यांना सल्ला देतात, त्यांचं मतपरिवर्तन करतात.

‘मनातल्या मनात’ एकत्र आले सोनाली-सिद्धार्थ
SHARES

मागील बऱ्याच वर्षांपासून भारतीय मनोरंजन क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या शेमारू एंटरटेनमेंटच्या नुकत्याच सुरू झालेल्या व्हीडिओ स्ट्रीमिंग सेवा शेमारूमीनं ‘मनातल्या मनात’ हा आपला नवीन ओरिजिनल मराठी शो सुरू केला आहे. या निमित्तानं सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर हे मराठी सिनेसृष्टीतील दोन आघाडीचे कलाकार एकत्र आले आहेत. 


५ एपिसोडची वेब सिरीज 

'मनातल्या मनात' ही पाच एपिसोडची वेब सिरीज आहे. याचं लेखन शिरीष लाटकर यांनी केलं असून, दिग्दर्शन संदीप मनोहर नवरेनं केलं आहे. या मालिकेत अभिषेक आणि शिवानी यांचं आयुष्य चित्रित करण्यात आलं आहे. लग्नासाठी सज्ज असलेल्या अभिषेक आणि शिवानी यांच्या लग्नापूर्वीच्या पाच भेटी या मालिकेत चित्रित केल्या गेल्या आहेत. अभिषेक आणि शिवानी यांची व्यक्तिमत्वं आणि विचारसरणी भिन्न आहे. मजेशीर बाब म्हणजे त्यांची हृदयं त्यांना सल्ला देतात, त्यांचं मतपरिवर्तन करतात आणि ते आपल्या आयुष्याचा सर्वांत महत्त्वाचा निर्णय घेत असताना गोंधळात टाकतात. 


वेगळं कथानक

'मनातल्या मनात' हा सोनालीचा पहिला डिजिटल शो आहे. या शोबाबत सोनाली म्हणाली की,  मी मागील बऱ्याच वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत आहे. 'मनातल्या मनात'सोबत डिजिटल प्लॅटफॉर्मवर माझी पहिली मालिका असल्यानं खूप उत्साहित आहे. हा एक खूप छान अनुभव असल्यानं यापुढंही डिजिटल क्षेत्रात जास्तीत-जास्त काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. सिद्धार्थ म्हणाला की,  चित्रपट, टीव्ही आणि वेब मालिकांमधील सीमारेषा धूसर होऊ लागल्या आहेत. ‘मनातल्या मनात’चं कथानक वेगळं आहे. त्यामुळं बरीच जोडपी 'मनातल्या मनात'शी स्वतःला जोडून घेतील मला खात्री आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबाबत मी खूप खूश आहे.



हेही वाचा -

विशाखानं रोवली 'स्वामीधाम कलाश्रय'ची मुहूर्तमेढ

'बाळा' करणार चौकार-षटकारांची आतषबाजी!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा