मिका म्हणतो 'आता फक्त भारतीयांसाठीच शो करणार'!

 Mumbai
मिका म्हणतो 'आता फक्त भारतीयांसाठीच शो करणार'!

'हमारा पाकिस्तान' म्हटल्यामुळे वादात अडकलेल्या गायक मिका सिंगने आता स्पष्टीकरण देणारा 54 सेकंदचा एक व्हिडिओ जारी केला आहे. खास करून राज ठाकरे यांना उद्देशून हा व्हिडिओ त्याने जारी केला आहे. तो म्हणाला 'आता आपण फक्त भारतीयांसाठीच शो करणार'.

मिका सिंग 12 ऑगस्टला अमेरिकेत गाण्याचा शो करणार असल्याचे त्याने सांगितले होते. या शोपूर्वी 'भारत आणि पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन एकत्र साजरा करूया' असे तो आपल्या चाहत्यांना म्हणाला होता आणि हा व्हिडिओ देखील त्याने ट्विटरवर शेअर केला होता. त्यानंतर नेटिझन्सने ट्विटरवर त्याचा चांगलाच समाचार घेतला.

त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी 'आता मिकाने महाराष्ट्रात माईक तरी पकडून दाखवावा' असे खुले आव्हान दिले होते.

त्यामुळे आता मिका सिंगने स्पष्टीकरण देणारा एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये त्याने राज ठाकरे आणि अमेय खोपकर यांचे नाव घेत 'तुम्ही निश्चिंत राहा, मी फक्त भारतीयांसाठीच शो करणार आहे आणि मला भारतीय असण्यावर गर्व आहे. तसेच हा व्हिडिओही मी शेअर केला असून तुम्ही जरूर पाहा' असं तो सांगत आहे.
हेही वाचा

पालिका मलिष्कावर दावा ठोकणार का नाय?


Loading Comments