• मनसेचे अमेय खोपकर यांना नोटीस
SHARE

दादर - शिवजयंतीनिमित्त शिवाजी पार्क परिसरात ढोलताशे वाजवल्याने मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अमेय खोपकर यांनी शिवाजी पार्कमध्ये ढोलताशा पथक बोलावले होते. महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी होत असताना वंदन ढोल ताशा पथकाच्या 30 ढोलवादकांनी या वेळी ढोल वादन केले. शिवाजी पार्क हे शांतता क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आवाज आणि ध्वनी प्रदूषण करण्यास बंदी आहे. तरीही नियमांचे उल्लंघन करून अमेय खोपकर यांनी ढोलताशा पथक बोलवून ढोल वाजवल्यामुळे शिवाजी पार्क पोलिसांनी मनसेला नोटीस बजावली आहे.

शिवजयंतीनिमित्त मनसेच्या वतीने दादरच्या शिवाजी पार्कमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवाजी पार्क येथे शिवतीर्थावर शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर मनसेच्या वतीने पुष्पवृष्टीही करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त वंदन ढोल ताशा पथक याठिकाणी बोलावले होते. यामध्ये प्रामुख्याने मुलींचा समावेश असलेला पहायला मिळाले त्याच बरोबर या ढोल ताशा पथकात 30 ढोल समाविष्ट होते. यावेळी ढोल ताश्याच्या गजरात महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी, संदीप देशपांडे, विनोद खोपकर, मनसे नेते शशांक नागवेकर, मनसे नेते नितीन सरदेसाई, माजी नगरसेवक संदीप देशपांडे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. मनसे कार्यकर्त्यांसह स्थानिक रहिवाशी उपस्थित होते. मनसे कार्यकर्त्यांनी केसरी फेटे बांधले होते. हॅलिकॉप्टरमधून अमेय खोपकर यांच्या पत्नी स्वाती खोपकर यांनी पुष्पवृष्टी केली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या