'तो'सुद्धा पडलाय लावणीच्या प्रेमात

वांद्रे - लावणीचं विश्व उलगडून दाखवणारा नटरंग हा मराठी चित्रपट चांगलाच गाजला. लावणीचा भाग असलेल्या पुरुषांच्या आयुष्याचा हा पट होता. पण, आता प्रत्यक्षातही एक तरुण लावणी शिकतोय... 28 वर्षांचा आयटीत काम करणारा महेश लावणीच्या छोट्या-मोठ्या गोष्टी आत्मसात करतोय. संगीतबारीचे भूषण कोरगांवकर यांनी आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या लावणी नृत्य कार्यशाळेतही तो सहभागी झाला होता. संगीत नाटक अकादमी विजेत्या शकुंतला नगरकर यांनी या कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना लावणीचे धडे दिले. ही कार्यशाळा नुकतीच वांद्र्यात झाली. सहभागी झालेल्यांना लावणीच्या इतिहासाचीही ओळख करून देण्यात आली.

Loading Comments