Advertisement

मी कधीही निशाची फसवणुक केली नाही : करण मेहरा

निशाच्या आरोपानंतर आता करणची प्रतिक्रिया समोर आली असून त्याने निशाचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

मी कधीही निशाची फसवणुक केली नाही : करण मेहरा
SHARES

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता करण मेहरा(Karan Mehra)च्या अडचणी आणखीन वाढल्या आहेत. निशा रावल(Nisha Rawal)नं करणविरोधात घरगुती हिंसाचारा(Domestic Violence)ची तक्रार दाखल केली. त्यानंतर मुंबई पोलिसां(Mumbai Police)नी सोमवारी करणला अटक केली होती. अटकेनंतर काही तासातंच त्याची जामिनावर सुटका झाली.

निशानं करणवर त्याचे विवाहबाह्य संबध असल्याचा आरोप लावला आहे. यामुळे अनेक वर्षांपासून दोघांच्या नात्यात तणाव असल्याचं तिनं म्हटलं. निशाच्या या आरोपानंतर आता करणची प्रतिक्रिया समोर आली असून त्याने निशाचे सर्व आरोप फेटाळले आहेत. निशाची कधीच फसवणुक केली नाही, असं करणने म्हटलं आहे.

एका न्यूज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत करणनं निशानं केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. करण म्हणाला, "मला ठाऊक होते की, असे सर्व आरोप माझ्यावर लावले जातील आणि माझे नाव अनेकांशी जोडले जाईल. पण या सर्व कथा निराधार आहेत. मी निशाची कधीही फसवणूक केली नाही आणि माझे विवाहबाह्य संबंधही नाहीत."

दरम्यान त्याआधी करणनं त्याची बाजू मांडताना म्हटलं होतं की, "निशा बायपोलर आणि आक्रमक आहे तसंच ती शिवीगाळ करते असा दावा केला होता. तो म्हणाला होता, 'निशाच्या म्हणण्याप्रमाणे मी कायदेशीर मार्गाचा वापर करण्यासाठी तयार होतो. मी माझ्या आई-बाबांशी बोलण्यासाठी त्यांच्या खोलीत गेलो. तेव्हा निशा देखील तिथे आली आणि तिने माझ्यासह माझे आई-वडील आणि भाऊ यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ती जोरजोरात ओरडत होती. ती माझ्यावर थुंकली. मी जेव्हा तिला बाहेर जाण्यास सांगितलं तेव्हा ती मला धमकी देऊ लागली. मी इथून निघून गेले तर काय करते ते पाहाच अशी धमकी तिनं मला दिली होती. त्यानंतर तिनं स्वतःचं डोकं भिंतीवर आपटायला सुरुवात केली आणि नंतर हे सर्व मी केल्याचं सर्वांना सांगितलं."

एका मुलाखतीत निशा रावलनं म्हटले होतं की, करणवर केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी तिच्याकडे पुरावे आहेत. पती करण मेहराच्या फोनवर काही मसेज सापडल्यानंतर त्याच्या अफेअर (Extramarital Affair) बद्दल लक्षात आल्याचं ती म्हणाली आहे. मात्र कुटुंब आणि मित्र परिवारापासून तिनं सर्व गोष्टी लपवल्या. लग्न टिकणार नाही हे लक्षात आल्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं निशानं सांगितलं.

सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी दोघांत कडाक्याचं भांडण झालं आणि हे प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचलं. त्यानंतर नेहा रावलनं पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी करण मेहराला चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये बोलावलं. काही तासांच्या चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली.

अभिनेता करण मेहराची पत्नी निशा रावल हीदेखील एक अभिनेत्री आहे. या दोघांचे २०१२ मध्ये लग्न झाले होते. त्यांना एक चार वर्षांचा मुलगा असून काविश असं त्याचं नाव आहे.



हेही वाचा

मीरा चोप्रा या अभिनेत्रीची होणार चौकशी, पालिकेचे खोटे ओळखपत्र देऊन घेतली होती लस

श्वेता तिवारीच्या नवऱ्याचा सोसायटीत ड्रामा, सीसीटीव्ही फूटेज आले समोर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा