Coronavirus cases in Maharashtra: 920Mumbai: 526Pune: 101Pimpri Chinchwad: 39Islampur Sangli: 25Kalyan-Dombivali: 23Ahmednagar: 23Navi Mumbai: 22Thane: 19Nagpur: 17Panvel: 11Aurangabad: 10Vasai-Virar: 8Latur: 8Satara: 5Buldhana: 5Yavatmal: 4Usmanabad: 3Ratnagiri: 2Kolhapur: 2Jalgoan: 2Nashik: 2Other State Resident in Maharashtra: 2Ulhasnagar: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Gondia: 1Palghar: 1Washim: 1Amaravati: 1Hingoli: 1Jalna: 1Total Deaths: 52Total Discharged: 66BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

अनटचेबल, एकता कपूरनं वाटली केळी, पण...

मंदिराबाहेर बसलेल्या गरीबांना ती केळी वाटत आहे हे चांगलं आहे. पण ती ज्या पद्धतीनं केळी वाटत आहे हे फार निराशाजनक आहे. पाहा याचा व्हिडिओ...

अनटचेबल, एकता कपूरनं वाटली केळी, पण...
SHARE

टीव्ही क्वीन एकता कपूर आपल्या मालिका आणि चित्रपटांसाठी नेहमीच चर्चेत असते. एकताच्या मालिका टीआरपीमध्ये आघाडीवर असतात. पण अलीकडे एकताचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला नाही


एकता ट्रोलर्सच्या निशाण्यावर

एकता कपूर ही देवाची फार मोठी भक्त आहे, हे आपण अनेकवेळा पहिले आहे. सध्या एकता कपूरचा एक मंदिराबाहेरचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एकता कपूर मंदिराच्या बाहेर बसलेल्या लोकांना केळी वाटताना दिसत आहे. मात्र आता एकता कपूर तिच्या व्हिडिओमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे


एकताचं निराशाजनक वागणं

मंदिराबाहेर बसलेल्या गरीबांना ती केळी वाटत आहे हे चांगलं आहे. पण ती ज्या पद्धतीनं केळी वाटत आहे हे फार निराशाजनक आहे. यामुळेच अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. व्हिडीओमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की, एकता गरिबांमध्ये केळी वाटताना लोकांचा स्पर्श आपल्याला होऊ नये याची खबरदारी घेत आहे.


युझर्स संतापले

लोक या पोस्टवर कमेंट करत, एकताच्या या वागण्यावर आपला आक्षेप नोंदवत आहेत. एक व्यक्ती लिहितो, 'वाह! केळी देण्याचा हा चांगला मार्ग आहे, लोकांच्या हातावर ती फेकणे. जर तुला असे वाटत असेल की, अशा लोकांना स्पर्श केल्यानं तुला कोणता आजार होईल, तर अशी कृत्ये करूच नयेत.' दुसऱ्यानं लिहिलं आहे की, 'केळी देऊन असे वाटत आहे की गरिबांवर जणू काही उपकार करत आहे.'


अशाप्रकारे एकताच्या वागण्यावर अनेक जण नाराज झाले आहेत. मात्र दुसरीकडे जेव्हा तिचे चाहते तिच्यासोबत एक फोटो क्लिक करण्याची विनंती करतात, तेव्हा ती आनंदाने त्यांना फोटो देताना दिसून येत आहे. हे पाहून तर एकताच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे.

एकताकडून उत्तर नाही

अद्याप, एकता कपूरनं याप्रकरणावर कुठलीच प्रक्रिया दिली नाही. तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, नुकताच अल्ट बालाजीवर 'मेंटलहुड' या मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या मालिकेत अभिनेत्री करिश्मा कपूर मुख्य भूमिकेत दिसली आहे. हा व्हिडिओ एकता कपूरनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. मेंटलहुड ही मालिका मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे. करिश्मा कपूर मोठ्या ब्रेकनंतर अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. अशाप्रकारे करिश्मा डिजिटल क्षेत्रात पदार्पण करत असून ही तिची पहिली मालिका आहे.   हेही वाचा

जयललिता यांच्या जयंतिनिमित्त 'थलायवी'चा पोस्टर प्रदर्शित

Exclusive Interview : 'मुन्ना'नं मिर्जापूर २ संदर्भात केलं हे वक्तव्य

संबंधित विषय
संबंधित बातम्या