Advertisement

हे पाहुणे येणार विरुष्काच्या रिसेप्शनला!


हे पाहुणे येणार विरुष्काच्या रिसेप्शनला!
SHARES

विराट कोहली अाणि अनुष्का शर्मा या हाॅट कपलनं ११ डिसेंबरला सर्वांनाच धक्का देत अापल्या सुखी संसाराला सुरुवात केली. थेट इटलीमध्ये जाऊन लगीनगाठ बांधल्यानंतर फिनलँडमध्ये हनिमूनही साजरा केला. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी दिल्लीमध्ये ग्रँड रिसेप्शन दिल्यानंतर अाता सर्वांनाच उत्सुकता अाहे ती मंगळवारी रात्री लोअर परळ येथील सेंट रेगिस येथे रंगणाऱ्या विरुष्काच्या मुंबईतील दुसऱ्या रिसेप्शनची. या रिसेप्शनमध्ये कोणते पाहुणे येणार, विरुष्का कोणत्या कपड्यांमध्ये अवतरणार, याबाबत सर्वांचीच उत्कंठता शिगेला पोहोचली अाहे. अॅस्टर बाॅलरूममध्ये रंगणाऱ्या या सोहळ्यात तब्बल ३९५ पाहुणे उपस्थित राहणार अाहेत.


क्रिकेटपटूंची मांदियाळी

भारतीय संघ काही दिवसांनंतर दक्षिण अाफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणार अाहे. पण त्याअाधी होणाऱ्या विराटच्या रिसेप्शनसाठी जणू भारतीय क्रिकेट संघच सेंट रेगिस हाॅटेलमध्ये दाखल होणार अाहे. विक्रमवीर रोहित शर्मा, महेंद्रसिंग ढोणी, युवराज सिंग, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची उपस्थिती असेल. अाॅफस्पिनर हरभजन सिंग अापली पत्नी गीता बासरा हिच्यासह लंडनध्ये सुट्टीचा अानंद लुटत असल्यामुळे तो या रिसेप्शनला हजर राहू शकणार नाही.


तिन्ही खान अाणि बाॅलीवूड

'रब ने बना दी जोडी' या सिनेमातून शाहरूख खानसह बाॅलीवुडमध्ये अनुष्काने पदार्पण केलं होतं. त्यानंतर पीके या चित्रपटात ती अामीर खानसह झळकली होती. तसेच सलमान खानसह तिचा सुलतान हा चित्रपटही खूप गाजला होता. बाॅलीवुडमधील हे तिन्ही खान तसेच अख्ख्या बाॅलीवुडला विरुष्काच्या रिसेप्शनचं निमंत्रण मिळालं अाहे. अनुष्काचे सल्लागार अादित्य चोप्रा, राणी मुखर्जी, करण जोहर, कतरिना कैफ यांच्यासह बाॅलीवुडमधील दिग्गज तारे-तारका या रिसेप्शनला उपस्थित राहणार अाहेत. त्याचबरोबर रिलायन्सचे मुकेश अंबानी अाणि नीता अंबानी हेसुद्धा उपस्थित राहणार असल्याचे समजते.


हेही वाचा - 

अनुष्का-विराटच्या पेहरावाची बातच काही और...

अशी सुरू झाली विराट-अनुष्काची लव्हस्टोरी!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा