Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

ऑगस्ट महिन्यातील पावसाने मोडला ४४ वर्षांचा विक्रम

जून आणि जुलैमध्ये पावसाने दडी मारली होती. मात्र, ऑगस्ट महिन्यातील पावसाने या दोन महिन्यांची कसर भरून काढली. एवढंच नाही तर ऑगस्टमधील पावसाने विक्रम केला आहे.

ऑगस्ट महिन्यातील पावसाने मोडला ४४ वर्षांचा विक्रम
SHARES

जून आणि जुलैमध्ये पावसाने दडी मारली होती. मात्र, ऑगस्ट महिन्यातील पावसाने या दोन महिन्यांची कसर भरून काढली. एवढंच नाही तर ऑगस्टमधील पावसाने विक्रम केला आहे. ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पावसाने  भारतातील पावसाचा ४४ वर्षांचा विक्रम मोडला आहे.  भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा २५ टक्के जास्त पाऊस पडला आहे. १९७६ साली ऑगस्ट महिन्यात सर्वात जास्त पाऊस पडला होता. 

१ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण देशभर ७४९.६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरी २३७.२ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी २५ टक्के जास्त पाऊस पडला आहे. असा पाऊस १७९६ मध्ये ऑगस्ट महिन्यात पडला होता. आतापर्यंत १९०१ एक पासून २०२० पर्यंतच्या १२०  वर्षांमध्ये सर्वात जास्त पाऊस १९२६  आली पडला होता. हा पाऊस सरासरीपेक्षा ३३  टक्के जास्त होता.

यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वात जास्त पाऊस मध्य भारतातील राज्यांमध्ये पडला आहे. तो दर वर्षीच्या सरासरीपेक्षा ५७ टक्के जास्त आहे. तर पूर्व भारत आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा १८ टक्के कमी पाऊस पडला आहे. तर दक्षिण भारतात यावर्षी सरासरीपेक्षा ४२ टक्के जास्त पाऊस पडला आहे.

मुंबई आणि उपनगरात चांगला पाऊस कोसळत आहे. नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, पालघर, वसई याठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अधूनमधून पाऊस पडत आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही पाऊस पडत आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग  जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.

केंद्रीय जल आयोगाच्या मते, या महिन्यातील चांगल्या पावसामुळे देशातील जलाशयांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दुष्काळाचे संकट बरेच कमी झाले आहे. मागील दहा वर्षांचा विचार केल्यास यावर्षी ऑगस्टमध्ये जलसाठ्यांची स्थिती बरीच चांगली आहे.हेही वाचा -

बाप्पाच्या विसर्जनासाठी यंदा ४४५ विसर्जनस्थळं सज्ज

वांद्रे-कुर्ला संकुलात युलु ई-बाईक सुविधासंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा