Advertisement

'या' भागात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढल्यानं पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

'या' भागात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
SHARES

दक्षिण कोकण आणि गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटकात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढल्यानं पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

१७ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात कोकणसह आतल्या भागात पाऊस पूर्णपणे सक्रिय राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. गडगडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसानं थोडी उसंत घेतली होती. मात्र वातावरण बदलल्यानं पुन्हा पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे. सोयाबीनसह अनेक पिकं ही काढणीला आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर शेतकऱ्यांनी चिंता करू नये. पिकांचं जे नुकसान झाले त्याचा पंचनामा करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.



हेही वाचा

ठाकरे सरकारचं पुढचं पाऊल! आरेतील वन जमिनीच्या प्राथमिक अधिसूचनेला मान्यता

मुंबईकरांना जाणवतोय 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा