पावसाने मोडला १९ वर्षांचा विक्रम

यंदा आत्तापर्यंतचा ऋतूमधील पाऊस ३ हजार ४५३ मिलीमीटरपर्यंत पोहोचला आहे. हा पाऊस १९ वर्षांमधील ऋतूतील सर्वाधिक पाऊस आहे.

SHARE

यंदा मुंबईसह राज्यभरात पडलेल्या पावसानं अनेक विक्रमांची नोंद केली आहे. काही दिवसांपूर्वी या पावसानं सप्टेंबर महिन्यातील सरासरी पावसाचा विक्रम मोडला होता. अशातच, यंदा आत्तापर्यंतचा ऋतूमधील पाऊस ३ हजार ४५३ मिलीमीटरपर्यंत पोहोचला आहे. हा पाऊस १९ वर्षांमधील ऋतूतील सर्वाधिक पाऊस आहे.

सर्वाधिक पाऊस

मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१० मध्ये सर्वाधिक पाऊस म्हणजे ३३२७.९ मिलीमीटर नोंदविण्यात आला होता. मात्र, यंदाच्या पावसानं हा विक्रम मोडला असून, सांताक्रूझ इथं १५ सप्टेंबरच्या अपेक्षित सरासरीच्या तब्बल १३९३ मिलीमीटर पाऊस अधिक झाला आहेतर कुलाबा इथं ४९३.१ मिलीमीटर पाऊस सरासरीहून अधिक आहे.

पावसाचं अस्तित्व

दरम्यान, ३० सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसाचं अस्तित्व असणार आहे. त्यामुळंपावसाळा संपताना आणखी एका नवा विक्रमाची नोंद होऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याशिवाय, येत्या २ दिवसांमध्ये कोकणात एखाद-दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरींचा अंदाज आहेमुंबईत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहेरविवारी मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे.हेही वाचा -

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर टोल वसूलीसाठी नवी कंपनी

बेस्टची नवी मिनी एसी बस दाखलसंबंधित विषय
ताज्या बातम्या