१४, १५ तारखेला मुंबईत रेड अलर्ट, मुसळधार पावसाचा अंदाज


SHARE

गेल्या शनिवारपासून सुरू झालेल्या पावसानं मुंबई शहरासह, उपनगरातही धुमाकुळ घातला होता. या पावसामुळं मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्यानं मुंबईकरांची एकच तारांबळ उडाली. मात्र बुधवार सकाळपासून मुसळधार पावसानं विश्रांती घेतल्यानं मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळाला. परंतु दोन दिवसानंतर म्हणजेच येत्या १४ व १५ जुलैला परत एकदा मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 


रोज १०० मिमी पाऊस

येत्या १४ व १५ जुलैला मुंबई शहर तसचं उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. या दोन्ही दिवशी प्रादेशिक हवामान विभागानं रेड अलर्टही जारी केला असल्यानं मुंबईत दर दिवशी १०० मिमी पाऊस पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.येत्या शनिवारी अाणि रविवारी मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. गुजरात तसचं इतर भागात पावसासाठी चक्रीवादळाप्रमाणे परिस्थिती येत्या शनिवारपर्यंत निर्माण होणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कोकण किनारपट्टीसह मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात होईल.
-  महेश पालावत, हवामानतज्ज्ञ,  स्कायमेट, हेही वाचा -

पावसात शाळेला सुट्टी देण्याचा निर्णय पालिकेकडे - तावडे

मेट्रो-३ च्या कामामुळं वरळी नाका महापालिका शाळेला तडे
संबंधित विषय
ताज्या बातम्या