Advertisement

मुंबईत थंडी वाढली, १६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी मुंबईकरांना गुलाबी थंडी अनुभवायला मिळाली.

मुंबईत थंडी वाढली, १६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
SHARES

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी मुंबईकरांना गुलाबी थंडी अनुभवायला मिळाली. उत्तरेकडील शीतलहरीमुळे मुंबईतील पारा खाली घसरला आहे. सांताक्रुझ येथे मंगळवारी १६ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईतील या सत्रातील हे सर्वात नीचांकी तापमान असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.

हवामान विभागाच्या (आयएमडी) पश्चिम विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली. अपेक्षेनुसार आज सकाळी मुंबईचा पारा घसरला. मुंबईतील सांताक्रुझ येथे १६ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. काळजी घ्या आणि बहुप्रतिक्षित मुंबईतील हिवाळ्याचा आनंद घ्या”, असं ट्वीट त्यांनी केलं.

सोमवापरपासून मुंबईसह ठाणे आणि उपनगरसोबतच कोकण आणि विदर्भातील तापमानात मोठी घट होणार आहे. येत्या एक-दोन दिवस तापमान असंच असणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.हेही वाचा -

राजहट्ट व बालहट्टासाठीच मेट्रो कारशेडची जागा बदलली- किरीट सोमैय्या

ब्रिटन, आखाती देशांतून येणाऱ्या प्रवाशांना सक्तीने क्वारंटाइन, मुंबई महापालिकेचा निर्णयRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा