Advertisement

मुंबईत तापमानात पुन्हा घट, मोसमातील कमी तापमानाची नोंद

गेले दोन दिवस मुंबईकरांना उकाडा जाणवत होता. पण सोमवारी कमाल आणि किमान तापमानामध्ये घट नोंदवण्यात आली.

मुंबईत तापमानात पुन्हा घट, मोसमातील कमी तापमानाची नोंद
SHARES

सोमवारपासून मुंबईकरांना थंडी जाणवू लागली आहे. गेले दोन दिवस मुंबईकरांना उकाडा जाणवत होता. पण सोमवारी कमाल आणि किमान तापमानामध्ये घट नोंदवण्यात आली.

अरबी समुद्रात गुजरातच्या दक्षिणेस तयार झालेली चक्रवाती वर्तुळाकार आणि द्रोणीय स्थितीमुळे शुक्रवारपासून मुंबई आणि परिसरात अनेक ठिकाणी तापमानात मोठी घट होण्याबरोबरच पावसानेदेखील हजेरी लावली. ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान शुक्रवारी ३० अंशापर्यंत घसरले. त्यामध्ये गेल्या दोन दिवसांत थोडा चढउतार झाला.

मात्र सततचे ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे सोमवारी तापमानात एक अंशाची घट झाली. कुलाबा केंद्रावर २७ अंश, तर सांताक्रूझ केंद्रावर २६.९ अंश कमाल तापमान नोंदवण्यात आले. मोसमातील हे सर्वात कमी कमाल तापमान आहे.

रविवारी मध्यरात्री आणि सोमवारी पहाटे शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. कांदिवली १८.६ मिमी, कुलाबा १२.२० मिमी तर अनेक ठिकाणी पाच ते १५ मिमी पाऊस नोंदवण्यात आला.

परिणामी, किमान तापमानातदेखील घट झाली. रविवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या नोंदीनुसार सांताक्रूझ आणि कुलाबा केंद्रावर २२ अंश किमान तापमान नोंदविण्यात आले.



हेही वाचा

८०० वर्षांनंतर 'या' दिवशी होणार ‘ख्रिसमस स्टार’चं दर्शन

मुंबईतल्या ४ कंपन्यांना प्रदूषण विभागाची नोटीस

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा