Advertisement

दादरची महाराष्ट्र व्यापारी पेठ गजबली


दादरची महाराष्ट्र व्यापारी पेठ गजबली
SHARES

सणासुदीच्या काळात कपडे असो वा खाद्यपदार्थांची विक्री अनेकदा चढ्या भावानेच होत असते. शिवाय वस्तूंचा दर्जा उत्तम असेल याची शाश्वतीही नसते. पण असं एक ठिकाण आहे, जिथे ग्राहकांना दर्जेदार वस्तू वाजवी दरांत उपलब्ध होतात. ते ठिकाण म्हणजे दादरमधील महाराष्ट्र व्यापारी पेठ. गणेशोत्सव ते दिवाळी दरम्यान ६५ ते ६८ दिवस गर्दीने अखंड फुलणारी व्यापारी पेठ १८ ऑगस्टपासून सुरू झाली असून २३ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. डॉ. डिसील्व्हा शाळेच्या मैदानात सुरू असलेल्या या पेठेत विविध वस्तूंनी सजलेले १०० हून अधिक स्टॉल्स ग्राहकांना मनसोक्त खरेदी करण्यासाठी सज्ज आहेत. 

गेल्या २९ वर्षांपासून एकाच ठिकाणी भरणारी ही व्यापारी पेठ गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीत ग्राहकांचे मुख्य आकर्षण ठरते. येथे केवळ मुंबईतीलच नव्हे, तर ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातून ग्राहक खरेदीसाठी येतात.
६० टक्के स्टाॅल महिला उद्योजकांचे

एकूण स्टाॅलपैकी ६० टक्के स्टॉल महिला उद्योजकांना देण्यात आले आहेत. पेठेत उटणे, तेल, साबणापासून फराळाच्या वस्तू, दागिने, गृहोपयोगी वस्तू, कोकणी मसाले यांसह अनेक नवीन वस्तू दिवाळी, दसरा, गणेशोत्सव हे सण लक्षात घेऊन विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. नवरात्रीसाठी रंगबीरंगी साड्या, दाराची तोरणे, पारंपरिक दागिने अशा एक ना अनेक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.येथे चादरी, कपडे, चटण्या, लोणची सर्वच एका ठिकाणी खरेदी करता येतात. ही बाजारपेठ ३ महिन्यांऐवजी कायम स्वरूपी ठेवल्यास बरे होईल. ग्राहकांना गृहउपयोगी वस्तूंसोबत येथे दिवाळीतील फराळही एकाच जागी घेता येताे.

- नेहा पाटील, ग्राहक


गेल्या तीन वर्षांपासून मी व्यापारी पेठेत स्टॉल लावत आहे. ग्राहकांचा माझ्या स्टाॅलला उत्तम प्रतिसाद मिळतो. केवळ दादरमधील नव्हे, तर जेथे जेथे महाराष्ट्र बाजार पेठ आयोजित केली जाते, तेथे प्रत्येक ठिकाणी आम्ही स्टॉल लावतो.

- कविता किशोर परब, व्यापारी
हेही वाचा - 

दिवाळीसाठी महाराष्ट्र व्यापारी पेठ सज्ज

गिरगावात भरली ग्राहक पेठ
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement