Advertisement

दिवाळीसाठी महाराष्ट्र व्यापारी पेठ सज्ज


दिवाळीसाठी महाराष्ट्र व्यापारी पेठ सज्ज
SHARES

दादर - डॉ.डिसिल्व्हा शाळेच्या मैदानात गेल्या 28 वर्षांपासून दिवाळीसाठी महाराष्ट्र व्यापारी पेठेचं आयोजन करण्यात येत आहे. मराठी व्यावसायिक, उद्योजक आणि व्यापा-यांचा परस्पर समन्वय आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही संस्था काम करते. मराठी तरुणतरुणींना उद्योग व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी मराठी व्यापारी मित्र मंडळाने महाराष्ट्र व्यापारी पेठ ही संकल्पना आणली. पेठेत मराठी उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देतानाच सर्वसामान्यांना देखील एकाच छताखाली विविध वस्तू उपलब्ध करून दिल्या जात आहेत
गणेशोत्सवाच्या आधीपासून ते दिवाळी संपेपर्यंत अशी 65 ते 68 दिवस यशस्वीरीत्या चालणारी ही पहिलीच पेठ आहे. पेठेत 100 स्टॉल्स असून त्यातही 60 टक्के स्टॉल हे महिला उद्योजकांना दिले आहेत. 2 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महाराष्ट्र व्यापारी पेठेत दिवाळीसाठी लागणारं साहित्य, विविध प्रकारचे दागिने, गृहोपयोगी वस्तू, पदार्थ आणि पेय यांसह अनेक वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा