Advertisement

गणेशोत्सवात बाप्पाला दाखवा 'या' पदार्थांचा नैवेद्य

मोदकांशिवाय देखील गणेशउत्सवात बाप्पासाठी अनेक गोड पदार्थ तयार केले जातात.

गणेशोत्सवात बाप्पाला दाखवा 'या' पदार्थांचा नैवेद्य
SHARES

गणेश उत्सव हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. या दहा दिवसांच्या उत्सवात गणपती बाप्पाला आवडणाऱ्या पदार्थांचा नैवद्य घरोघरी आनंदानं बनवला जातो. गणेशाचे गोड पदार्थांवर प्रेममुळेच घरातील प्रत्येकालात या काळात गोड पदार्थांची मेजवानी मिळते.

तसं तर मोदक हा त्याचा सर्वात आवडीचा पदार्थ. पण मोदकांशिवाय देखील गणेशउत्सवात बाप्पासाठी अनेक गोड पदार्थ तयार केले जातात.

१) पूरण पोळी

आणखी एक पदार्थ जो गणेशोत्सवा दरम्यान गणपतीला भोग म्हणून अर्पण केला जातो. हा एक खवा किंवा मावा, तूप, हरभऱ्या डाळीचे पीठ(बेसन) आणि दुधापासून बनविला जाणारे खास महाराष्ट्रीयन व्यंजन आहे. साटोरी पोळीप्रमाणे वर्तुळाकार किंवा गोल असते.


२) चुरमा लाडू

हे तळलेले कुरकुरीत लाडू गुळ, गहू आणि तुपापासून बनवले जातात. हे गणेश चतुर्थीच्या वेळी प्रसाद म्हणून वाटले जातात. एकच लाडू खाऊन कोणाचच मन भरणार याची मला खात्री आहे.


३) रवा पोंगळ

याला रवा म्हणजेच सुजी आणि मुगाच्या डाळीच्या पिठा बरोबर तूप टाकून बनवतात. यामध्ये बेदाणे, काजू आणि बदाम टाकले जाते. याला आपण मुगाचा शिरा देखील म्हणू शकता. या शिवाय आपल्याला इच्छा असल्यास रव्याचा शिरा देखील नैवेद्यात ठेऊ शकता.

४) केळ्याचा शिरा  

मॅश केलेले केळे, रवा आणि साखरेपासून बनवलेला शिरा रव्याच्या शिरा प्रमाणेच असतो. हे देखील गणपतीला प्रिय असल्याचे मानले गेले आहे. त्यांना केळ्याचा नेवेद्य देखील आवडीचा आहे.

५) नारळी भात

नारळाच्या दुधात किंवा पाण्यात तांदूळ भिजवून ठेवतात नारळाचे गीर तांदुळात मिसळून शिजवून भात करतात.हेही वाचा

Ganesh Chaturthi 2021 : गणपती बाप्पाला मोदक का आवडतात?

बाप्पा मोरया! यंदाही गणेशोत्सव मंडळांचा आरोग्य उपक्रमांवर भर

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा