Advertisement

Ganesh Chaturthi 2021 : गणपती बाप्पाला मोदक का आवडतात?

बाप्पाला मोदक एवढा आवडतो तरी का? याबद्दल तुम्हाला माहीत आहे का?

Ganesh Chaturthi 2021 : गणपती बाप्पाला मोदक का आवडतात?
SHARES

गणपती बाप्पाला मोदक आवडतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण बाप्पाला मोदक एवढा आवडतो तरी का? याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला यासंदर्भातच माहिती देणार आहोत.

पुराणानुसार, पार्वतीला देवतांनी अमृतापासून तयार केलेला एक दिव्य मोदक दिला. मोदक पाहून तिची दोन्ही मुलं कार्तिकेय आणि गणेश मागे लागली की तो मोदक त्यांना मिळायलाच हवा. त्यावेळी पार्वतीनं मोदकाचं वर्णन करून सांगितलं. पण यासोबतच एक अट पुढं ठेवली ती म्हणजे, जो कुणी आपली श्रेष्ठता प्राप्त करेल त्याला तो मोदक मिळेल.

हे ऐकून कार्तिकेयनं मोरावर बसून सगळ्या तीर्थस्थानांचं दर्शन घेतलं. तर गणेशनं फक्त आई-वडिलांना प्रदक्षिणा घातली. हे पाहून पार्वती म्हणाली, पूजा, तीर्थस्थानांचं दर्शन, यज्ञ, मंत्र, व्रत एकीकडे आणि आई-वडिलांची पूजा एकीकडे. सर्वात श्रेष्ठ ही आई-वडिलांची पूजा आहे. तेव्हा शंकर-पार्वतीनं असं ठरवलं की हा मोदक गणेशालाच द्यावा. त्यानंतर मोदक हे गणेशाचे आवडतं खाद्य बनलं.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा