Advertisement

गिरगावात साकारली ७००० चौरस फुटांची महारांगोळी

दरवर्षीप्रमाणं यंदाही गुढीपाडव्यानिमित्त गिरगावात 'हिंदू नववर्ष स्वागत यात्रा' काढण्यात येणार आहे. गिरगावातील फडके श्री. गणेश मंदिरापासून निघणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठाना'तर्फे आयोजन करण्यात येणार आहे.

गिरगावात साकारली ७००० चौरस फुटांची महारांगोळी
SHARES

दरवर्षीप्रमाणं यंदाही गुढीपाडव्यानिमित्त गिरगावात 'हिंदू नववर्ष स्वागत यात्रा' काढण्यात येणार आहे. गिरगावातील फडके श्री. गणेश मंदिरापासून निघणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठाना'तर्फे आयोजन करण्यात येणार आहे. यंदा यात्रेचं हे १७ वं वर्ष असून, या वर्षीची यात्रा ‘ज्योतीने तेजाची आरती’ या संकल्पनेवर आधारित आहे.


महारांगोळीचं आयोजन

हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्तानं स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानानं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यावर्षी महारांगोळीचं आयोजन करण्यात आलं आहे. रंगशारदाचे प्रसाद मुंढे आणि स्वास्थ्यरंगचे डॉ. तेजस लोखंडे यांच्या सहकार्यानं ‘ज्योतीने तेजाची आरती’ या यात्रेच्या संकल्पनेवर आधारित ७००० चौरस फुटाची महारांगोळी काढण्यात आली आहे. या महारांगोळीसाठी २०० किलो रांगोळी आणि ६०० किलो रंग वापरण्यात आले आहेत. तसंच, रंगशारदा आणि स्वास्थ्यरंगच्या २५ कलाकारांतर्फे ७ तासांच्या अथक प्रयत्नांतून ही महारांगोळी काढण्यात आली आहे.


एअरस्ट्राईकला मानवंदना

पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशदवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या वायू दलाच्या एअरस्ट्राईकला या रांगोळीमधून मानवंदना देण्यात आली आहे. तसंच, एअरमार्शल अभिनंदनच्या शौर्याची गाथा रांगोळीच्या माध्यमातून मांडली आहे.



हेही वाचा -

वसई-विरार हे सर्वात कमी 4G नेटवर्क मिळणारं शहर

७ एप्रिलला रंगणार ६ वी सतीश सबनीस बुद्धिबळ स्पर्धा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा