कांदिवलीत दिवाळी अंकांचा फराळ

Kandivali East
कांदिवलीत दिवाळी अंकांचा फराळ
कांदिवलीत दिवाळी अंकांचा फराळ
कांदिवलीत दिवाळी अंकांचा फराळ
See all
मुंबई  -  

ठाकूर संकुल – कांदिवीलत मनसेच्या शाखांमध्ये वाचकांसाठी दिवाळी अंक उपलब्ध करुन दिले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागअध्यक्ष हेमंतकुमार कांबळे व महिला विभाग अध्यक्षा आरती पवार-नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा साहित्य फराळ उपलब्ध केलाय. प्रभाग क्र. 24 ठाकूर संकुल आणि प्रभाग क्र. 26 सिंग एस्टेट येथील मनसेच्या शाखांमध्ये शंभर दिवाळी अंकांच्या प्रत्येकी दोन प्रती ठेवण्यात आल्या आहेत. कोणीही यावे, आपले नाव, संपर्क क्रमांक व पत्ता शाखेतल्या वहीत लिहावा आणि आवडेल तो अंक वाचायला घरी न्यावा, सात दिवसांच्या आत हा अंक परत आणून द्यावा व नवीन अंक वाचायला घेऊन जावा, असा हा उपक्रम आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.