...म्हणून वाटले 40 हजार वडा पाव!

दहिसर - बाप्पांचा विसर्जन सोहळा म्हणजे गणेशभक्तांसाठी पर्वणीच. या दिवशी लाखो भक्तजन तहान भूक विसरून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. या भक्तांना तब्बल 40 हजार वडा पाव वाटप करण्याचं काम दहिसरमधील एक गृहस्थ करताहेत. कानूभाई गरवाल असं त्यांचं नाव. दहिसर पूर्व एस .व्ही.रोड येथून गोराई खाडी येथे विसर्जनासाठी जाणाऱ्या मिरवणुकीतील भक्तांना ते वडापाव वाटप करतात. गेल्या 12 वर्षांपासून ते सेवाभावी वृत्तीनं हे काम करताहेत.

Loading Comments