Advertisement

मुंबई लोकलमध्ये विठूरायाचा जयघोष


SHARES

महाराष्ट्रासह मुंबईतही आषाढी एकादशी जल्लोषात साजरी केली जात आहे. वर्षभरातील २४ एकादशींपैकी या एकादशीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हणतात. या दिवशी व्रत ठेवतात. तसंच मंदिरांमध्ये भजन-किर्तनाचे देखील आयोजन केले जाते. फक्त मंदिरातच नव्हे तर मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्येही उत्साहात आषाधी एकादशी साजरी केली जाते. अशाच एका भजनी मंडळाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

'गणेश प्रवासी भजन मंडळ' गेल्या २५ वर्षांपासून ट्रेनमध्ये आषाढी एकादशी साजरी करत आहेत. बोरिवलीहून चर्चगेटला जाणाऱ्या ८ वाजून १५ मिनिटांच्या ट्रेनमध्ये दरवर्षी टाळ-मृदुंगाच्या गजरासह आषाढी एकादशी जल्लोष केला जातो.

रोजच्या प्रवाशांसह अनेकजण खास या उत्साहात सहभागी होण्यासाठी येतात आणि एकत्रितपणे विठूनामाचा गजर करतात. टाळ-मृदुंगच्या तालावर 'ग्यानबा-तुकाराम'च्या जयघोषात विठ्ठलाचे नामस्मरण करत भाविक लीन होतात. हे सर्व भक्त वर्षभरही सोशल मीडियाद्वारे एकमेकांच्या संपर्कात राहतात, हे विशेष!

गणेश प्रवासी भजन मंडळातील सर्व सदस्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. ग्रुपवर मेसेज टाकल्यावर या कार्यक्रमाबद्दल सर्वांना माहिती मिळते. तसं तर आम्ही सर्व या ट्रेनमध्ये भेटतोच. त्यामुळे आम्हाला या कार्यक्रमाबद्दल माहिती असते. लांब राहणाऱ्यांना आणि ज्यांची भेट रोज न होणाऱ्यांनाना व्हॉट्सअपवर मेसेज केला जातो.

- श्रीकांत शिंदे, सदस्य, गणेश भजन मंडळ

'गणेश प्रवासी भजन मंडळा'त कुणी पदाधिकारी नसून सर्व सदस्यच आहेत. त्यामुळे कार्यक्रमाचा खर्च सर्व सदस्य स्वत:च करतात. असे हे अनोखे मंडळ आणि त्यांची अनोखी विठ्ठलभक्ती, जी रोजच्या कंटाळवाण्या प्रवासालाही नादमय करते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा