SHARE

माउंट मेरी जत्रा आणि बकरी ईदला प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बसेस सोडण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. 11 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरपर्यंत वांद्र्यात माऊंट मेरीची जत्रा भरणार आहे . तर 13 सप्टेंबरला बकरी ईद आणि 14 सप्टेंबरला बासी ईद  असणार आहे.  या दरम्यान जादा  90  बसगाड्या रस्त्यावर धावणार आहेत.  यासह  बसनिरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. जत्रा आणि बकरी ईदच्या दिवशी  शहर आणि उपनगरात बेस्टच्या प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळे बस्ट प्रशासन सज्ज झाले आहे.  

माऊंट मेरीसाठी बेस्टच्या जादा बसगाड्या

वांद्रे बस स्थानक (प.) ते हिल रोड (मेहबुब स्टुडीओ) मार्गावर बेस्टच्या जादा गाड्या 
11 सप्टेंबर  :  सकाळी  - 25, संध्याकाळी 27 जादा गाड्या  
12 सप्टेंबर :  सकाळी  - 12, संध्याकाळी  16 जादा गाड्या
13 सप्टेंबरला  : सकाळी- 12, तर संध्याकाळी - 16 जादा गाड्या  
14 सप्टेंबरला सकाळी - 15, तर संध्याकाळी - 21 जादा गाड्या  
15 सप्टेंबरला सकाळी -12, तर संध्याकाळी - 16 जादा गाड्या  
17 सप्टेंबरला सकाळी, 25 - तर संध्याकाळी - 30 जादा गाड्या  
18 सप्टेंबरला सकाळी, 35 - तर संध्याकाळी - 40 जादा गाड्या  

बकरी ईद आणि बासी ईदनिमित्त बेस्टचे जादा बसेस
13 सप्टेंबर-  बस क्रमांक  
25 मर्या., 28, 33,88, 124, 231, 241, 313, 351, 357, 375मर्या, 408, 422, 507 मर्या. 

14 सप्टेंबरला  बस क्रमांक 
7 मर्या., 8 मर्या., 28, 33, 37, 88, 124, 180, 203, 231, 242, 253, 256, 271, 309 मर्या., 332,341, 350, 355 मर्या., 376, 408, 422, 524 मर्या. आणि  सी-71 जलद 

संबंधित विषय
ताज्या बातम्या