Advertisement

दादर, माहीम, धारावीकरांसाठी 'फिरता कृत्रिम तलाव आपल्या दारी'

विसर्जनाच्या दिवशी समुद्रावर गर्दी होऊ नये कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे. यासाठी मुंबईत कृत्रिम तलाव तयार केले आहेत. तर आता फिरता कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे.

दादर, माहीम, धारावीकरांसाठी 'फिरता कृत्रिम तलाव आपल्या दारी'
SHARES

विसर्जनाच्या दिवशी समुद्रावर गर्दी होऊ नये कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे. यासाठी मुंबईत कृत्रिम तलाव तयार केले आहेत. तर आता फिरता कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. दादर, माहीम व धारावीकरांसाठी 'फिरता कृत्रिम तलाव आपल्या दारी' हा उपक्रम मुंबई महापालिकेने सुरू केला आहे. एक दूरध्वनी केल्यास फिरता तलाव आपल्या इमारती, चाळीसमोर हजर होणार आहे.

पालिकेच्या २४ विभाग कार्यालय क्षेत्रात 300 पेक्षा अधिक कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. याशिवाय आता पालिकेने फिरते कृत्रिम तलाव तैनात ठेवले आहेत. जी उत्तर विभागात 'फोन करा, फिरता कृत्रिम तलाव आपल्या दारी' हा उपक्रम सुरू केला आहे. दादर, माहीम व धारावी परिसरात विसर्जनासाठी फिरता कृत्रिम तलावाची गरज असल्यास ०२२२४३९७८८८ या हेल्पलाइनवर फोन करा, असं आवाहन पालिकेने केलं आहे.

याशिवाय मुंबई पोलिस परिमंडळ-दोन, आम्ही गिरगांवकर आणि पालिकेच्या 'सी' विभाग कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शाडुच्या मातीच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी गिरगावातील ठाकुरद्वार सिग्नल येथे कृत्रिम तलावाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 


हेही वाचा -

वसईत विसर्जनासाठी 'तलाव आपल्या घरी' संकल्पना

यंदा कोरोना योद्ध्याच्या रुपात अवतरले बाप्पा!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा