Advertisement

कुटुंबियांसोबत घरच्या घरी 'अशा' प्रकारे साजरा करा ख्रिसमस

जगभरात कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे यावर्षी घरातच ख्रिसमस साजरा करावा लागणार आहे.

कुटुंबियांसोबत घरच्या घरी 'अशा' प्रकारे  साजरा करा ख्रिसमस
SHARES

नाताळ किंवा ख्रिसमस हा एक ख्रिस्ती सण आहे. हा सण दर वर्षी २५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी ख्रिस्ती बांधवांचे लाडके प्रभू येशू यांचा जन्म झाला होता. जगाभरात हा सण साजरा होतो. काही ठिकाणी मध्यरात्री हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रात देखील हा सण जल्लोषात साजरा केला जातो.

नाताळ सणामध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः लहान मुले या सणाची खूप आतुरतेने वाट बघतात. सांताक्लॉज येऊन मुलांना भेट वस्तू आणि खाऊ देतात असा मुलांचा समज असतो. महाराष्ट्रातील ख्रिस्ती लोक दिवाळीप्रमाणे या दिवशी करंज्या आणि अन्य खाद्यपदार्थांचे एकमेकांस आदान-प्रदान करतात. लहान मुलांना सांताक्लॉजच्या वेषात येऊन भेटवस्तू देतात.

या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छा पत्रे देऊन परस्पर अभिनंदन करतात. आपल्या घरात रोषणाई करतात. घराला सजवतात. 'ख्रिसमस ट्री' करतात. हे झाड या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. ख्रिसमस ट्री हे स्वर्गातल्या ईडन बागेतील झाड आणि क्रूसाचे झाड यांचे प्रतीक आहे.

पण यावर्षी जगभरात कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे  यावर्षी घरातच ख्रिसमस साजरा करावा लागणार आहे. आम्ही देखील तुम्हाला घरातल्या घरात ख्रिसमस कसा साजरा करता येऊ शकतो? यासाठी काही टिप्स देणार आहेत. घरात राहून देखील तुम्ही ख्रिसमस साजरा करू शकता.


  • ख्रिसमसच्या सुट्टीत कुटुंबियांसोबत चित्रपट बघण्याचा आनंद वेगळाच. तुम्ही एखादा चांगला ख्रिसमसवर आधारीत चित्रपट किंवा तुम्हाला जो आवडेल तो चित्रपट घरी पाहू शकता. यासाठी तुम्ही “A Christmas Carol” किंवा “The Nutcracker” डाऊनलोड करू शकता. यावर तुम्हाला चांगले चित्रपट पाहता येतील.
  • ख्रिसमसला देता येतील असे हातानं बनवलेले कार्ड तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. यात तुमच्या मुलांना देखील सहभागी करा. म्हणजे कुटुंबियांसोबत एक चांगला वेळ घालवू शकाल आणि मुलांना देखील मजा येईल. हे कार्ड तुम्ही तुमच्या नातेवाईकांना देखील पाठवू शकता जे की कोरोनामुळे तुम्हाला भेटू नाही शकत.
  • चॉकलेट केक, बिस्किटं असे खाण्याचे पदार्थ तुम्ही घरी बनवू शकता. गरजूंना अशा खाण्याच्या पदार्थांचं वाटप करू शकता. गरजूंच्या आयुष्यातील सिक्रेट सँटा तुम्ही बनू शकता.
  • तुम्ही बाहेर नाही शकत. पण तुम्ही तुमचं घर पाहिजे तसं सजवू शकता. कुटुंबियांसोबत घरात लायटिंग किंवा कँडल्स लावू शकता. याशिवाय ख्रिसमस ट्री आपल्या मुलांसोबत घरी बनवू शकता.     
  • कुटुंबियांसोबत एखादा गेम खेळू शकता. ज्यामध्ये तुम्हाला पण आणि तुमच्या मुलांना देखील मजा येईल.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा