Advertisement

शोभायात्रा,पारंपारिक नृत्याने नववर्षाचे स्वागत


शोभायात्रा,पारंपारिक नृत्याने नववर्षाचे स्वागत
SHARES

ठाकूरद्वार - गिरगावच्या ठाकूरद्वार परिसरात स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आणि शिवसेनेच्यावतीने मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्थानिकांनी पारंपारिक वेशात गिरगाव नाका ते फटके मंदिर आणि ठाकूरद्वार-चिराबाजार मार्गे भव्य शोभायात्रा यात्रा काढली. सकाळी 8 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याहस्ते या शोभायात्रेचे उद्घाटन झाले. 

यावेळी खासदार अनिल देसाई,अरविंद सावंत यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी सैराट चित्रपटाच्या कलावंतांनी देखील उपस्थिती लावली होती. विशेष म्हणजे यंदा उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे 25 फूट हनुमानाची भव्य मूर्ती तसेच रामाची 20 फूटांची मूर्ती. गिरगावातील तरुण-तरुणींसाठी सेल्फी पॉईंट देखील उभारण्यात आला होता. यावेळी मराठी संस्कृतीतील ग्रामीण भागातील लोकप्रिय असणारी भारूड,नमन सादर करण्यात आली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा