Advertisement

बघा, एन. डी. स्टुडिओतील दहीहंडीत ‘सलमान’ 'असा' झाला सामील


बघा, एन. डी. स्टुडिओतील दहीहंडीत ‘सलमान’ 'असा' झाला सामील
SHARES

कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी एन. डी. स्टुडिओतील बाॅलिवूड थीम पार्ककमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त दहीहंडी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सलमान खान अवतरल्यावर उपस्थितांच्या भुवया उंचावला. ‘दबंग’ सिनेमात साकारलेल्या चुलबुल पांडेच्या वेषात सलमान या उत्सवात सहभागी झाला. त्याने श्री गणेशाची आरती केली आणि ‘ढाक्कुमाकुम’च्या ठेक्यावर गोविंदांसोबत तालही धरला. 

पण उपस्थितांच्या नंतर लक्षात आलं की हा खराखुरा सलमान नसून बुलबुल पांडे म्हणजेच सलमानची हुबेहूब काॅपी करणारा मराठमोळा कलावंत सागर भोईर होता. हा खरा सलमान नसला तरी उपस्थितांना मात्र सलमानसोबत नाचल्याचा आनंद देऊन गेला.


नितीन देसाईंसोबत बुलबुल पांडेच्या वेषात सलमानने केली श्री गणेशाची आरती.


सलमानला पाहण्यासाठी गर्दी केलेल्या चाहतेही श्री गणेशाच्या आरतीमध्ये झाले सहभागी.


गोविंदांच्या खांद्यावर बसून नितीन देसाईंसोबत बालगोपाळांसोबत धरला ताल.


रंगात आलेल्या देसाईंनी महिला प्रेक्षकांसोबत धरला फुगडीचा फेर.


गोविंदांच्या खांद्यावर उभे राहून बालगोपाळांना देसाईनी दिली सलामी.


लेझीमच्या तालावर महिलांनी सादर केलं सुरेख नृत्य.



हेही वाचा-

थरांचा थरार! आतापर्यंत ३६ गोविंदा जखमी

बघा, 'सविता दामोदर परांजपे'च्या प्रीमियरला कोण कोण आलं?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा