गर्दीच्या जागी चोरांपासून सावधान !


SHARE

मुंबई - जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर... खबरदार... गर्दीचा फायदा उचलून तुमचे मोबाईल आणि इतर सामान चोरीला जाऊ शकते. याचा अनुभव गुरुवारी झालेल्या गणेशोत्सवादरम्यान आला. गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरांनी आपला डाव साधला आहे. मुंबईतील लालबाग, काळाचौक्की, सीपी टँक, ग्रॅन्ट रोड, गिरगाव भागातून तब्बल १८३ मोबाईल चोरीला गेलेत. फक्त मोबाईलच नाही तर गळ्यातल्या चेन चोरल्याचंही समोर आलंय. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अंजली नायडू या महिलेला अटक केलीय.

एकट्या काळाचौक्की पोलीस ठाण्यात मोबाईल गेल्याच्या ११८ तर १२ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. काळाचौकितल्या बीए रोड, भारत माता, यशवंत चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर भक्तांचे मोबाईल गेले आहेत. डी बी मार्ग पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गिरगाव, ग्रॅण्ट रोड परिसरातून पन्नास मोबाईल चोरीला गेल्याचं समोर आलंय. तर व्ही पी रोड पोलीस ठाण्यातील पंधरा मोबाईल गेल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या