अभ्युदयनगरमध्ये रंगला पर्यावरण स्नेही रंगोत्सव


  • अभ्युदयनगरमध्ये रंगला पर्यावरण स्नेही रंगोत्सव
  • अभ्युदयनगरमध्ये रंगला पर्यावरण स्नेही रंगोत्सव
SHARE

काळाचौकी - पर्यावरणस्नेही रंगोत्सव 2017 चे आयोजन सोमवारी अभ्युदयनगर येथील इमारत क्रं. 32 च्या आवारात करण्यात आलं होतं. नैसर्गिक रंगांचा वापर करून रंगपंचमी साजरी करावी आणि पर्यावरण तसेच आरोग्याचे रक्षण करावे असा संदेश देण्यासाठी ह्युमॅनिटी फाउंडेशन आणि अभ्युदयनगर नुतन सहकरी गृहनिर्माण संस्था यांच्या वतीने रंगोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमात नैसर्गिक रंग कसे तयार करायचे याची माहिती देण्यात आली. तसेच रसायन मिश्रित रंगांमुळे पर्यावरण आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यावर मार्गदर्शनही करण्यात आले. या वेळी अभ्युदयनगर नुतन सहकरी गृहनिर्माण संस्था अध्यक्ष यशवंत माजगावकर, फाऊंडेशनचे आणि संस्थेचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांसह बच्चे कंपनी उपस्थित होती.

संबंधित विषय
ताज्या बातम्या