वांद्र्यात जश्न-ए-मिलाद


  • वांद्र्यात जश्न-ए-मिलाद
  • वांद्र्यात जश्न-ए-मिलाद
  • वांद्र्यात जश्न-ए-मिलाद
  • वांद्र्यात जश्न-ए-मिलाद
SHARE

वांद्रे - इद-ए-मिलादच्या निमित्तानं वांद्रे पूर्वेच्या बेहरामनगरमध्ये रात्रभर जुलूस काढण्यात आला. ट्रक आणि मोटार सायकलींवरून मुस्लिम बांधवांच्या रॅली देखील काढण्यात आल्या. बेहरामनगर, नवापाडावांद्रे पूर्व इथल्या सुन्नी दावते इस्लामी अंतरराष्ट्रीय संस्थेकडून या दिवशी जुलूस काढला गेला. या वेळी भाभा इस्पितळातल्या अंदाजे 300 रुग्णांना फळं आणि गुलाब वाटण्यात आलं. तसंच या संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांनी निर्मलनगर पोलीस ठाण्याजवळील माहिम दर्ग्याबाहेरील गरिब अनाथांना भेट दिली. त्यांनाही फळं-गुलाब वाटण्यात आलं. 'याच दिवशी मोहम्मद पैगंबर यांचा जन्म झाल्याचं संस्थेचेे सदस्य इम्तियाझ शेख यांनी सांगितलं'.

संबंधित विषय
ताज्या बातम्या