गणेशोत्सव २०१९: गणेशोत्सवात महावितरणकडून सवलतीच्या दरात मिळणार वीज

यंदा गणेशोत्सवात मुंबईसह राज्य भरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दरात वीज मिळणार आहे.

SHARE

यंदा गणेशोत्सवात मुंबईसह राज्य भरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दरात वीज मिळणार आहे. महावितरणकडून गणेशोत्सव काळात मंडळांना तात्पुरती वीज जोडणी दिली जाणार आहे. तसंच, प्रतियुनिट विजेचा दर ४ रुपये ५५ पैसे असून, तो घरगुती वीज ग्राहकांना पुरवल्या जाणाऱ्या विजेच्या तुलनेत कमी आहे. गणेश मंडळांनी महावितरणाच्या स्थानिक कार्यालयाकडं अर्ज केल्यानंतर पुढील २४ तासांत कनेक्शन देण्यात येणार आहे.

बिलाचा आर्थिक भार

वीज बिलाचा आर्थिक भार टाळण्यासाठी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं बेकायदेशीरपणे वीज वाहिनीवर हुक टाकुन वीज घेतात. त्यामुळं शॉर्ट सर्किट यांसारख्या दुर्घटना घडण्याची शक्यता असते. या दुर्घटना टाळण्यासाठी आणि गणेश मंडळांना अधिक आर्थिक भार पडू नये यासाठी महावितरण सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळं गणेश मंडळांना दिलासा मिळाला आहे.

वीज पुरवठा

१०० युनिटचा वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकाला ४ रुपये ३३ पैसे प्रतियुनिट दरानं वीज पुरवठा केला जातो. तसंच, १०० ते ३०० युनिटचा वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकाला ८ रुपये २३ पैसे प्रतियुनिट दरानं वीज पुरवठा केला जातो. मात्र, यंदा गणेशोत्सवात महावितरण ४ रुपये ५५ पैसे एवढ्या दरानं वीज पुरवठा करणार आहे.हेही वाचा -

राज ठाकरे चौकशीला गेलेत की सत्यनारायणाच्या पुजेला? अंजली दमानिया यांची टीका

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी ६ विशेष गाड्यासंबंधित विषय
ताज्या बातम्या