Advertisement

घाटकोपरमध्ये फटाक्यांच्या धुरामुळे ५३ जणांच्या डोळ्यांना त्रास


घाटकोपरमध्ये फटाक्यांच्या धुरामुळे ५३ जणांच्या डोळ्यांना त्रास
SHARES

घाटकोपर पश्चिमेकडील सिद्धार्थ नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सोमवारी रात्री केलेली फटाक्यांची आतिषबाजी परिसरातील रहिवाशांना चांगलीच भोवली. या जोरदार आतिषबाजीमुळे तयार झालेल्या धुराचा ५३ रहिवाशांना इतका त्रास झाला की या रहिवाशांवर रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची वेळ आली.ही फटाक्यांची आतिषबाजी सोमवारी रात्री करण्यात आली असली, तरी या धुराचा त्रास रहिवाशांना मंगळवारी सकाळी जाणवायला लागला. डोळे चुरचुरायला लागल्यानं ५३ रहिवाशांना संत मुक्ताबाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या रहिवाशांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचं रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.


घाटकोपर पश्चिमेकडील भटवाडीतील सिद्धार्थनगर येथे ही घटना घडली. मंगळवारी दुपारी डोळे चुरचुरत असल्याच्या तक्रारी घेऊन रुग्ण रुग्णालयात दाखल होऊ लागले. एकूण ५३ रुग्णांच्या डोळ्यांवर उपचार करुन सर्वांना घरी सोडून देण्यात आले.
- डॉ. संजयकुमार डोळस, अधिक्षक, संत मुक्ताबाई रुग्णालयडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
Advertisement