Advertisement

गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या कपड्यांच्या बाजारपेठेवर कोरोनाचं सावट

यंदा कपडा बाजाराकडं ग्राहकांनी पाठ फिरवल्यानं दुकानदारांच मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या कपड्यांच्या बाजारपेठेवर कोरोनाचं सावट
SHARES

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं यंदा सर्वच सणांवर संकट ओढावलं आहे. दरवर्षी धुमधडाक्यात साजरा होणारा गणेशोत्सव यंदा साधेपणानं पार पडणार आहे. आगमन व विसर्जन नसल्यामुळं मोठे मंडप वा घरगुती सजावटीच्या निमित्तानं मागणी असलेल्या गणेशोत्सवातील कपडा बाजार थंड पडला आहे. यंदा ग्राहकांकडून मागणी नसल्यानं घरगुती गणेशोत्सवाला लागणारे कापडी पडदे, झालर, शोभेच्या छत्र्या, गणपतीच्या शाली, तर सार्वजनिक मंडळांना लागणारे सजावटीचं सामन फेटे, टोप्या अशा वस्तू गोदामांमध्ये पडून आहेत.

यंदा कपडा बाजाराकडं ग्राहकांनी पाठ फिरवल्यानं दुकानदारांच मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. यंदा मागणीच नसल्यानं गतवर्षीचा माल पडून असून दुकानदारांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे. गणेशोत्सावाकरीता लागणाऱ्या कपड्याच्या खरेदीसाठी लालबाग व हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी असते.

यंदा कोरोनामुळं ही बाजारपेठ परिसरात शुकशुकाट आहे. या काळात कुडते, टी-शर्ट यांचीही मोठ्या प्रमाणात मागणी असते. एखादाच वापरात येतील अशा लाखो कुडत्यांची निर्मिती धारावीत केली जाते; पण कारागीर आणि मागणीही नसल्याने तिथं ही शुकशुकाट आहे. हेही वाचा -

गणपती विसर्जनासाठी कल्याण डोंबिवलीत ‘विसर्जन आपल्या दारी’ उपक्रम

वॉर्ड GS मध्ये गणेशोत्सवासाठी कृत्रिम तलावांच्या संख्येत वाढRead this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा