Advertisement

गणेशोत्सव २०१९: लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन


गणेशोत्सव २०१९: लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन
SHARES

मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन प्रसारमाध्यमांसाठी शुक्रवारी करण्यात आलं. 'नवसाला पावणारा' गणपती अशी या गणपतीची ख्याती असून, हा गणपती लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या गणपतीच्या दर्शनाला १० दिवस मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. 


लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचं हे ८६ वं वर्ष आहे. यावेळी लालबागच्या राजाला चांद्रयान २ चा देखावा साकारण्यात आला आहे. बाप्पाचं हे लोभस रुप डोळ्यात साठवावं असंच आहे.


लालबागच्या राजाचं दर्शन घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं. त्यामुळेच लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून लोक येत असतात.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा