Advertisement

गणेशोत्सव २०१९: मुंबई पोलिसांना मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान!

मुंबईकरांच्या रक्षणासाठी २४ तास दक्ष असणाऱ्या पोलिसांच्या कार्याला सलाम ठोकण्यासाठी यंदा गणेशगल्ली येथील सार्वजनिक उत्सव मंडळाने मुंबई पोलिसांना गणेश आरतीचा मान देण्याचं ठरवलं आहे.

गणेशोत्सव २०१९: मुंबई पोलिसांना मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान!
SHARES

मुंबईतील नामांकीत गणेशोत्सव मंडळांची पत एवढी वाढली आहे की काही मंडळांमध्ये भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनाच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अरेरावी केल्याचं आपण पाहिलं असेल. पण मुंबईकरांच्या रक्षणासाठी २४ तास दक्ष असणाऱ्या पोलिसांच्या कार्याला सलाम ठोकण्यासाठी यंदा गणेशगल्ली येथील सार्वजनिक उत्सव मंडळाने मुंबई पोलिसांना गणेश आरतीचा मान देण्याचं ठरवलं आहे.   

रामाचा अवतार

‘मुंबईचा राजा’ असं बिरूद मिरवणाऱ्या या मंडळाचं यंदाचं ९२ वं वर्ष आहे. यावर्षी या मंडळाने अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती देखावा म्हणून उभारली आहे. या भव्य देखाव्यातील २२ फुटी रामाच्या अवतारातील गणेशमूर्तीचं दर्शन यंदा भाविकांना घेता येणार आहे. मंडळातर्फे दरवर्षी समाजात वेगवेगळ्या स्तरात आपलं योगदान देणाऱ्या व्यक्तिंना आरतीचा मान देण्यात येतो.

 

म्हणून मान

त्यानुसार यंदा १० सप्टेंबर रोजी मुंबई पोलिसांना बाप्पाच्या आरतीचा मान देण्यात आला आहे. गणेशोत्सवातील १० दिवसच नाही, तर सण-उत्सवाच्या काळात मुंबई पोलिस अहोरात्र खडा पहारा देतात. त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित आहोत, त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठीच पोलिसांना यंदा  आरतीचा मान देण्यात आला आहे. सोबतच पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीत रहिवाशांचे प्राण वाचवणाऱ्या एनडीआरएफच्या जवानांना मान देण्यासाठी त्यांनाही ८ सप्टेंबर रोजी आरतीचा मान देण्यात आल्याची माहिती  सार्वजनिक उत्सव मंडळाचे सरचिटणीस स्वप्निल परब यांनी दिली.  

   


हेही वाचा-

गणेशोत्सव २०१९: 'चिचंपोकळीचा चिंतामणी'च्या देखाव्यात यंदा ७५ फुटी शिवलिंग

गणेशोत्सव २०१९: मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या १४ हजारांपलिकडे


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा