गणेशोत्सव २०१९: मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या १४ हजारांपलिकडे

यंदा मुंबई शहर आणि उपनगरात ६५० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची भर पडल्याने गणेशोत्सवातील धामधुमही वाढणार आहे.

SHARE

मुंबईतील प्रत्येक नाक्यावर सध्या सार्वजनिक गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. शहरातील मोठ्या मंडळांमध्ये बाप्पाचं आगमन झालं असून उर्वरित गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्ते बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत आहेत. यंदा मुंबई शहर आणि उपनगरात ६५० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची भर पडल्याने गणेशोत्सवातील धामधुमही वाढणार आहे. 

६५० हून अधिक नवीन मंडळं

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी मुंबई शहर-उपनगरात १३ हजार ३४७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं होती. यंदा त्यात ६५० हून अधिक मंडळांची भर पडल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या १४ हजारांपलिकडे गेली आहे.

'इथं' सर्वाधिक मंडळं

यातील सर्वाधिक गणेशोत्सव मंडळं पश्चिम उपनगरातील अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि दहिसर परिसरातील आहेत. तर, कुर्ला परिसरातही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या मोठी आहे. मुंबई शहरात मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळाचंच अस्तित्व दिसून येतं. 

कारण काय?

शहर-उपनगर परिसरात नवनव्या वसाहती तयार झाल्याने या वसाहतींमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचा कल वाढला आहे. त्यामुळे यंदा आर्थिक मंदीमुळे वर्गणीवर मर्यादा येऊनही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढली आहे. नव्या मंडळांपैकी बहुतेक मंडळांनी काही महिन्यांपूर्वीच नाव नोंदणी केल्याची माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी दिली. हेही वाचा-

गणेशोत्सव २०१९: चिंचपोकळीच्या चिंतामणीची आकर्षक रूपं

खबरदार! 'नवसाला पावणारा' बाप्पा असा दावा केल्यास कारवाई होण्याची शक्यतासंबंधित विषय
ताज्या बातम्या