Advertisement

पुढच्या वर्षी लवकर या..! मुंबईत बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात


पुढच्या वर्षी लवकर या..! मुंबईत बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात
SHARES

दहा दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर अखेर बाप्पाला निरोप देण्याचा दिवस उजाडला; अंनत चतुदर्शीच्या निमित्ताने घरगुती गणपतींसोबतच सार्वजनिक मंडळांनी आपापल्या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी जल्लद तयारी केली आहे. मुंबई परिसरातील सर्व चौपाट्या आणि कृत्रिम तलाव विसर्जनासाठी तयार ठेवण्यात आले आहेत. मुंबईतील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली असून विसर्जनाचा हा नयनरम्य सोहळा रात्री उशीरापर्यंत चालणार आहे.


रेल्वे सेवा सुरूच

रविवार असल्याने भाविकांची गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने विसर्जनासाठी ठिकठिकाणी यंत्रणा तयार ठेवली आहे. रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्याने रात्री उशिरापर्यंत रेल्वे वाहतूक सुरु राहील.


१६२ ठिकाणी विसर्जन

मुंबईत एकूण १६२ ठिकाणी गणपतींचं विसर्जन करण्यात येईल. मुंबई महापालिकेने ३० हून अधिक ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली असून चौपाट्यांवरही विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे. मुंबई शहरातील गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, मार्वे, मनोरी, गोराई, इ. चौपाट्यांवर विसर्जन करण्यात येणार आहे. अशा वेगवेगळ्या चौपाट्यांवर मिळून ५ हजारहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. चौपाट्यांवर मोटारबोटी, सीसीटीव्ही यंत्रणा, सर्चलाइट, लाइफगार्ड, निर्माल्य कलश, प्रथमोपचार केंद्रांची व्यवस्था महापालिकेतर्फे करण्यात आली आहे.


पोलिस जागोजागी तैनात

प्रत्येक विसर्जनस्थळ आणि प्रसिद्ध मंडळांच्या मिरवणूक मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असेल. सोबतच वाहतुकीचं नियंत्रण करण्यासाठी ३, १६१ हून अधिक वाहतूक पोलिस तसंच १, ५७० ट्रॅफिक वाॅर्डन जागोजागी उभे करण्यात आले आहेत. पोलिसांच्या मदतीला एनसीसी, एनएसएस आणि एनजीओंचे प्रतिनिधी कार्यरत आहेत.



हेही वाचा-

मुंबईतील घरगुती, सार्वजनिक मंडळाच्या गणेश विसर्जनाचे लाइव्ह अपडेट्स बघण्यासाठी 'इथं' क्लिक करा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा