Advertisement

गणपतीच्या दागिन्यांनी सजली दादरची बाजारपेठ

गणपती बाप्पासाठी रुद्राक्ष, सोनेरी मण्यांचे हार, लाल-पिवळ्या गोंड्याचे हार, मोत्यांचे हार आणि सॅटन रिबनपासून बनलेले हार तसंच विविध खड्यांच्या सोंडपट्ट्या, हातातील तोडे, कानांच्या पाळ्यांमध्ये घालायचे दागिने, जान्हवं या वस्तू गणेश भक्तांसाठी खास आकर्षण ठरत आहेत.

गणपतीच्या दागिन्यांनी सजली दादरची बाजारपेठ
SHARES

मुंबईसह राज्यभरात गुरुवारी १३ सप्टेंबर रोजी गणरायाचं आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या सजावटीच्या आकर्षक वस्तूंनी दादरमधील बाजारपेठ सजली आहे.

गणपती बाप्पासाठी रुद्राक्ष, सोनेरी मण्यांचे हार, लाल-पिवळ्या गोंड्याचे हार, मोत्यांचे हार आणि सॅटन रिबनपासून बनलेले हार तसंच विविध खड्यांच्या सोंडपट्ट्या, हातातील तोडे, कानांच्या पाळ्यांमध्ये घालायचे दागिने, जान्हवं या वस्तू गणेश भक्तांसाठी खास आकर्षण ठरत आहेत. 


यांची किंमत?

प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंना बंदी असल्यामुळे यंदा गुलाबी, पिवळा, लाल सॅटीन रिबीनच्या हाराला बाजारात पसंती मिळत आहे. बाजारात या सॅटीन रिबीनच्या हारांची किंमत ७० ते २०० रुपयांपर्यंत आहे. तर, मण्यांचे हार वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बाजारात उपलब्ध झाल्या असून यांची किंमत ५० ते ५०० रुपयांपर्यंत आहे.


याला ग्राहकांची पसंती

दरवर्षीप्रमाणे यंदा बाजारात मोत्यांच्या कंठ्या देखील विविध डिझाईनमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. मोत्यांच्या कंठ्याप्रमाणे विविध रंगांच्या खड्यांच्या कंठ्या स्वस्तात उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांची याला विशेष पसंती मिळत आहे. १ फुटांच्या मूर्तीपासून अगदी मोठ्या मूर्तीपर्यंत मोत्यांच्या कंठ्याचे हार उपलब्ध असून त्यांची किंमत ५० रुपयांपासून २५०० ते ३००० हजार रुपयांपर्यंत आहे.

यावर्षी गणपतीच्या मुकुटांमध्ये देखील विविध प्रकार आले आहेत. आकर्षक नक्षीकाम केलेले गणपतीच्या मुकूटांना मोठ्या प्रमाणात ग्राहकांची पसंती मिळताना दिसत आहे. या मुकुटांची किंमत ३०० रुपयांपासून ते अगदी २००० ते २५०० हजारांपर्यंत आहे.

गणपतीसाठी आमच्याकडे विविध प्रकारचे दागीने उपलब्ध झाले आहेत. यावर्षी प्लास्टीक बंदी असल्यामुळे मोत्याच्या मण्यांच्या हाराला आणि सॅटन रिबनपासून बनलेल्या हाराला ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. 

- चंदन कंदलकर, दागिने विक्रेते


हेही वाचा - 

कागदी लगद्यातून साकारल्या गणेश मूर्ती

गणेशोत्सव मंडळांनो, महाप्रसाद बनवायचाय, तर एफडीएकडे नोंदणी करा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा