Advertisement

कागदी लगद्यातून साकारल्या गणेश मूर्ती

करी रोड येथील लोहार कुटुंबातील मुर्तीकार प्रमिला लोहार या गेल्या सात वर्षापासून कागदी लगद्याच्या मूर्ती तयार करत आहेत. प्रमिला यांनी सुरुवातीला पाच मूर्ती तयार केल्या होत्या. यंदा त्यांनी ५० कागदी लगद्याच्या गणेश मूर्ती तयार केल्या आहेत.

कागदी लगद्यातून साकारल्या गणेश मूर्ती
SHARES

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. मात्र, 'प्लॅस्टर ऑफ पॅरिस'च्या मूर्तींमुळं प्रदूषण आणि निसर्गाची होत असलेली हानी लक्षात घेऊन यंदा 'इकोफ्रेंडली' गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी करी रोड येथील लोहार कुटुंबीयांनी कागदी लगद्याच्या मूर्ती तयार केल्या अाहेत. 



परदेशातही मागणी

करी रोड येथील लोहार कुटुंबातील मुर्तीकार प्रमिला लोहार या गेल्या सात वर्षापासून कागदी लगद्याच्या मूर्ती तयार करत आहेत. प्रमिला यांनी सुरुवातीला पाच मूर्ती तयार केल्या होत्या. यंदा त्यांनी ५० कागदी लगद्याच्या गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. मुंबईत या मुर्तींना गणेश भक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून अमेरिका, लंडन, मस्कत, स्पेन आणि दुबई या ठिकाणी मूर्ती पाठवल्या जात आहेत.  


४ फुटापर्यंत मूर्ती

एक फुटापासून ४ फुटापर्यंत कागदी लगद्याच्या मूर्ती तयार केल्या जात अाहेत. एक फुटाच्या मुर्तीची किंमत २५०० रुपये आहे, तर दीड फुट मुर्तीची किंमत ३५०० आहे. दोन फुटाची मूर्ती ६००० रुपयांना तर  तीन फुटाची मूर्ती किंमत ९००० रुपयांना मिळत आहे. 


कशी बनवली जाते मूर्ती

कागदाचे बारिक तुकडे स्मॅश केले जातात. यामध्ये झाडाचा डिंक आणि व्हाईटींग पावडर मिक्स करून त्याचा क्ले तयार केला जातो. तयार झालेला क्ले मूर्ती बनवण्याच्या मोल्डमध्ये पेस्टींग करून सुकवला जातो. त्यानंतर त्या मुर्तीवर रंग काम केलं जातं. मात्र, कागदी लगद्याची मूर्ती पुर्णपणे सुकायला ४ ते ५ तास लागतात.



हेही वाचा -

गणपती विर्सजनासाठी समुद्रात उभारणार लाईटचे टॉवर

यंदा रंगणार प्रो दहीहंडीचा थरार



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा