Advertisement

गणपती विर्सजनासाठी समुद्रात उभारणार लाईटचे टॉवर

गणेशोत्सवाच्या काळात गिरगाव चौपाटीवर मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन करणं सोयीचं व्हावं यासाठी बेस्ट प्रशासनातर्फे समुद्रात लाईटचे मोठे टॉवर उभे करून सर्चलाईट लावण्यात येणार आहे.

गणपती विर्सजनासाठी समुद्रात उभारणार लाईटचे टॉवर
SHARES

अवघ्या काही दिवसातचं गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. या आगमनासाठी सर्व ठिकाणी जय्यत तयारी सुरू असताना बाप्पाच्या विसर्जनासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. गणेशोत्सवाच्या काळात गिरगाव चौपाटीवर मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन करणं सोयीचं व्हावं यासाठी बेस्ट प्रशासनातर्फे समुद्रात लाईटचे मोठे टॉवर उभे करून सर्चलाईट लावण्यात येणार आहे.


बैठक आयोजित

सध्या गणेशोत्सवाची तयारी मुंबईत सुरू असून मुंबई शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विद्युत पुरवठा करणारा बेस्ट उपक्रम आपल्याकडील तंत्रशास्त्र आणि मनुष्यबळ यंत्रणेसह सज्ज झाल्याचं दिसत आहे. नुकतीच बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांच्या दालनात गणेशोत्सव समन्वय समितीचे नरेश दहिबावकर यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.


एक खिडकी योजना

या बैठकीदरम्यान चर्चेत विद्युत रोषणाईकरता एक खिडकी योजनेतंर्गत तात्पुरता वीजपुरवठा देणं, मार्गप्रकाश योजनेद्वारे गणपतीच्या विसर्जनासाठी खास प्रकाश योजना करणं, गणेशोत्सवाच्या काळात अत्याधुनिक संपर्क सुविधा कार्यान्वित करणं, तसंच मुंबईत तात्पुरत्या विद्युत पुरवठ्याच्या निमित्तानं लोबंखळणाऱ्या वायर्स काढून टाकणं यांसारख्या महत्त्वपूर्ण योजना बेस्ट उपक्रमातंर्गत तयार करण्यात आल्या आहेत.


सर्चलाईट लावण्याची तयारी

येत्या काही दिवसात जर महापालिकेनं गिरगाव चौपाटीजवळ समुद्रात टॉवर उभं करण्यास परवानगी दिली तर बेस्ट उपक्रमाच्यावतीने समुद्रात टॉवर उभा करून सर्चलाईट लावण्याची तयारी बेस्ट उपक्रमाने दर्शवली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात गणेश भक्तांच्या सोयीसाठी १८ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण रात्रभर १,७ मर्यादित, २१ मर्यादित, ४२, ४४, ६९, ६६ आणि २२ मर्यादित या बसमार्गावर जादा बसफेऱ्या चालवण्यात येणार आहे.


हेही वाचा -

मुंबईतील २२३ गणेशोत्सव मंडळांचे अर्ज नाकारले!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा