Advertisement

यंदा रंगणार प्रो दहीहंडीचा थरार

. यंदा गोकुळाष्टमीच्या दिवशी सरकारमान्य 'प्रो दहीहंडीचा थरार पाहायला मिळणार आहे. ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी 'प्रो दहीहंडी'ला मान्यता मिळावी अशी सरकारकडं मागणी केली होती. अखेर क्रिडा विभागानं या मागणीला मान्यता दिली आहे.

यंदा रंगणार प्रो दहीहंडीचा थरार
SHARES

दहीहंडी सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून मुंबईतील सर्व गोविंदा पथकांसाठी राज्याच्या क्रिडा विभागानं खुशखबर दिली आहे. यंदा गोकुळाष्टमीच्या दिवशी सरकारमान्य 'प्रो दहीहंडी'चा थरार पाहायला मिळणार आहे. ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी 'प्रो दहीहंडी'ला मान्यता मिळावी अशी सरकारकडं मागणी केली होती. अखेर क्रिडा विभागानं या मागणीला मान्यता दिली आहे.


१० गोविंदा पथकांची निवड

प्रो दहीहंडीच्या स्पर्धेचं आयोजनं ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानतर्फे करण्यात येणार आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशी संध्याकाळी ही स्पर्धा होणार असून क्रिडामंत्री विनोद तावडे आणि क्रिडा खात्याचे सचिव या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत. या 'प्रो दहीहंडी' स्पर्धेसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. तसंच, या स्पर्धेसाठी मुंबईसह ठाण्यातील गोविंदा पथकांपैकी १० गोविंदा पथकांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणं स्पर्धेत कमी वेळेत थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला पारितोषिक दिलं जाणार आहे.


'प्रो दहीहंडी' ही स्पर्धा दहीहंडीपेक्षा वेगळ्या पद्धतीची आहे. या स्पर्धेसाठी मुंबईसह ठाण्यातील १० गोविंदा पथकांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणं गोकुळाष्टमीनंतर डिसेंबर ते जानेवारी महिन्यात पुन्हा या स्पर्धेचं स्टेडियममध्ये आयोजन करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. 'स्पेन' देशात ज्याप्रकारे हा खेळ खेळला जातो, त्याचप्रमाणे हा खेळ वर्षभर खेळला जावा यासाठी हा प्रयत्न आम्ही करत आहोत.
- सुरेंद्र पांचाळ, सचिव, दहीहंडी समन्वय समिती



हेही वाचा-

विमा नसल्यास दहीहंडी पथकांना रचता येणार नाहीत थर! 

गणपती विर्सजनासाठी समुद्रात उभारणार लाईटचे टॉवर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा