Advertisement

बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला जल्लोषात सुरूवात


बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला जल्लोषात सुरूवात
SHARES

अकरा दिवसांच्या मुक्कामानंतर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक सज्ज आहेत. जड अंतकरणाने बाप्पाला निरोप देतानाच 'पुढच्या वर्षी लवकर येण्याचे' निमंत्रणही दिले जात आहे. मंगळवारी सकाळपासूनच मुंबईतील सर्व चौपाट्यांसह कृत्रिम तलावात घरगुती बाप्पाच्या विसर्जनाला जल्लोषात सुरुवात झाली. तर, मुंबईचा राजा सकाळी दहा वाजल्यापासून मार्गस्थ झाला असून लालबागच्या राजाच्या मिरवणुकीलाही सुरुवात झाली आहे.


मुंबई महानगरपालिका आणि पोलिस यंत्रणा विसर्जनासाठी सज्ज आहेत. मुंबईतील सर्व चौपाट्यांवर प्रचंड पोलिस बंदोबस्त असून लाईफ गार्डही तैनात आहेत. दादर, माहिम, जुहू, वर्सोवा आणि गोराई या चौपाट्यांवर सकाळी घरगुती बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात झाली. सकाळी नऊच्या सुमारास लालबागच्या राजाची आरती झाली आणि त्यानंतर बाप्पाला नेवैद्य दाखवण्यात आला. परंपरेनुसार कोळी नृत्याने लालबागचा राजा मार्गस्थ झाला. गुलाल, फुलांची उधळण लालबागच्या राजावर आणि मुंबईच्या राजावर होत असून भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' या जयघोषाने लालबागचा परिसर दुमदुमला आहे. विसर्जनाचा हा उत्साह बुधवार पहाटेपर्यंत असाच कायम राहणार आहे.


गुलाल, ढोल ताशांचा गजर याबरोबरच यंदा विसर्जनाच्या मिरवणुकीत अनेक मंडळांकडून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. लालबागच्या अशाच एका मंडळांने प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश 29 ऑगस्टच्या धर्तीवर दिला आहे.


गिरगावच्या राजाची थाटात मिरवणूक

जुहू चौपाटीवर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 446 घरगुती गणपतींचे विसर्जन झाले आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा