Advertisement

वरळीत शिवसह्याद्री फाऊंडेशनची शोभायात्रा


वरळीत शिवसह्याद्री फाऊंडेशनची शोभायात्रा
SHARES

वरळी - शिवसह्याद्री फाऊंडेशनच्या वतीने गुढी पाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. यंदाच्या शोभा यात्रेचं उद्घाटन मुंबईच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यंदा शिवसह्याद्री फाउंडेशनच्या शोभायात्रेचं 8 वं वर्ष आहे. या शोभायात्रेचं महत्त्वाचं आकर्षण ठरले ते वरळीचं साई इच्छा भजन मंडळ. वरळी मधील सर्वात तरुण अशी साई इच्छा भजन मंडळाची वेगळी ओळख आहे.

वरळीच्या जांबोरी मैदानातून सुरू झालेली ही शोभायात्रा संपूर्ण बिडीडी चाळीत फिरवण्यात आली. या वेळी स्थानिक महिलांनी लेझीम खेळत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी शोभा यात्रेत सहभागी झालेल्या महिला पारंपरिक वेशभूषेत नटल्या होत्या. लेझीम आणि भजनाबरोबरच या शोभा यात्रेत खऱ्या अर्थाने रंग भरले ते म्हणजे ढोल ताशा पथकाने. या भव्य रॅलीत अनेक वरळीकर सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

गुढी पाडव्याच्या या भव्य रॅली सोबतच शिवसह्याद्री पुरस्कार सोहळा 2017 हा कार्यक्रम देखील पार पडला. यावेळी पोलीस खात्यात उल्लेखनीय कामगिरी करणारे आणि राष्ट्रपती पदक (२०१६) हा पुरस्कार पटकवणारे रमेश शिंदे यांना गौरवण्यात आले. त्याचबरोबर वरळीमध्ये तरुण आणि दानशूर भजनी मंडळ समजल्या जाणाऱ्या साई इच्छा मंडळाला समाजसेवेसाठी मोलाची कामगिरी केल्याबद्दल गौरवण्यात आले. याबरोबरच वरळीमध्ये राहत असलेल्या 19 वर्षाच्या सायली महाराव हिने एव्हरेस्ट बेस्ट कॅम्प सर करण्याची कामगिरी पार पाडल्याबद्दल तिचाही गौरव करण्यात आला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement